Next
श्री विठ्ठल मंदिर कण्वाश्रमात रांगोळीचा भव्य गालिचा
दीपोत्सवानिमित्त सई मोने यांची कलाकृती
BOI
Friday, November 23, 2018 | 05:26 PM
15 0 0
Share this article:


पुणे : आकर्षक रंग, सुंदर नक्षीकाम असलेला रांगोळीचा भव्य गालिचा, त्याच्या सभोवती उजळलेले असंख्य दिवे, फुलांनी सजवलेले मंदिर... हे नयनरम्य दृश्य सोमवार पेठेतील श्री विठ्ठल मंदिर कण्वाश्रमात त्रिपुरारी पौर्णिमेला पाहायला मिळाले.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्थापन केलेली राही, रखुमाईसमवेतची श्री विठ्ठलाची मूर्ती असलेल्या तब्बल तीनशे वर्षे जुन्या वैशिष्ट्यपूर्ण श्री विठ्ठल मंदिर कण्वाश्रमात यंदाही त्रिपुरारी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. त्या निमित्ताने गुरुवारी (२३ नोव्हेंबर २०१८ रोजी) दीपोत्सव साजरा करण्यात आला. 


सई मोने
या वेळी सई मोने आणि इतर सहकारी महिलांनी १५ फूट बाय १२ फूट असा भव्य आकारातील रांगोळीचा गालिचा साकारला होता. यासाठी सुमारे ३०० किलो रांगोळी, ४० किलो रंग लागले. तब्बल १६ तास मेहनत घेऊन या महिलांनी हा सुंदर गालिचा तयार केला. सायंकाळी दिव्यांच्या उजेडात या रांगोळीचे सौंदर्य आणखीच खुलून दिसत होते. हा गालिचा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. ही सुंदर कलाकृती पाहण्याची संधी आणखी आठ दिवस भाविकांना मिळणार आहे. 

सई मोने या निवृत्त प्राध्यापिका, कीर्तनकार असून, गेली २७ वर्षे या मंदिरात त्या अशी भव्य रांगोळी काढत आहेत. सुरुवातीला त्या एकट्याच ही भव्य रांगोळी काढत असत, आता काही महिलांना मदतीला घेऊन त्या ही कलाकृती साकारतात.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Anjali About 241 Days ago
Our Mone kaku is really great Artist and kiratnkar too...We proud of you kaku
0
0
Kalyani Shivale About 242 Days ago
अप्रतिम वर्णन करण्यास शब्द नाहीत ईश्वरी कृपा आणि गुरू कृपा याहून वेगळी ती काय
0
0

Select Language
Share Link
 
Search