Next
अभंग गायन स्पर्धेत वैष्णवी जोशी प्रथम
रत्नागिरीतील गगनगिरी महाराज आश्रम आणि स्वराभिषेकतर्फे आयोजन
BOI
Friday, December 28, 2018 | 02:07 PM
15 0 0
Share this story

अभंग गायन स्पर्धेत गाताना स्पर्धक. सोबत प्रथमेश शहाणे (तबला), मंगेश चव्हाण (पखवाज), राकेश बेर्डे आणि अद्वैत मोरे (तालवाद्य), चैतन्य पटवर्धन (हार्मोनियम).

रत्नागिरी : येथील प. पू. गगनगिरी महाराज आश्रम आणि स्वराभिषेक या संगीत वर्गाच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित केलेल्या गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई स्मृती तालुकास्तरीय अभंग गायन स्पर्धेत वैष्णवी जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला. लीना खामकर, पौर्णिमा कांबळे आणि सानिका लिंगायत यांना अनुक्रमे द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ क्रमांक मिळाले.

थिबा पॅलेसजवळील श्री गगनगिरी महाराज आश्रम सभागृहात ही स्पर्धा झाली. रत्नागिरीतील प्रसिद्ध गायक आणि संगीतकार गंधर्वरत्न आनंद प्रभुदेसाई श्री गगनगिरी महाराज आश्रमात दत्तजयंती, गुरुपौर्णिमा या दिवशी दरवर्षी विनामूल्य गायन सादर करायचे. अगदी आजारपणातही त्यांनी गायनसेवा केली. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या शिष्यवर्गाने हा उपक्रम पुढे सुरू ठेवला आहे. प्रभुदेसाई यांनी केलेल्या या सेवेबद्दल कृतज्ञता म्हणून त्यांच्या नावाने ही स्पर्धा गगनगिरी महाराज आश्रमातर्फे घेण्यात आली. स्पर्धेचे नियोजन मठाचे व्यवस्थापक राम पानगले आणि ‘स्वराभिषेक’च्या सदस्यांनी व कलाकारांनी केले. रत्नागिरी तालुक्यातील १२ ते २० वयोगटांतील स्पर्धक यात सहभागी झाले होते.

स्पर्धेसाठी मंगेश चव्हाण (पखवाज), प्रथमेश शहाणे (तबला), चैतन्य पटवर्धन, मंगेश मोरे (हार्मोनियम), राकेश बेर्डे आणि अद्वैत मोरे (तालवाद्य) यांनी साथसंगत केली. महेंद्र पाटणकर यांनी सूत्रसंचालन केले. चिपळूण येथील वीणा कुंटे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. स्वराभिषेकच्या संचालिका विनया परब आणि त्यांचा शिष्यवर्ग, तसेच तन्वी बाणे, मनोज पाटणकर यांनी स्पर्धेचे उत्तम संयोजन केले. या दरम्यान स्पर्धेसाठी सहकार्य करणार्‍यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक, प्रमाणपत्र तसेच शिल्ड देऊन गौरविण्यात आले.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून गगनगिरी महाराज भक्त मंडळाचे अध्यक्ष प्रमोद शेरे, खल्वायन संस्थेचे प्रदीप तेंडुलकर, प्राचार्य राजशेखर मलुष्टे, संगीत शिक्षिका समिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link