Next
‘टीसीएस’ ‘बिलिअन स्टेप्स चॅलेंज’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रेस रिलीज
Friday, October 26, 2018 | 05:21 PM
15 0 0
Share this storyमुंबई : टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) ५०व्या वर्षपूर्तीनिमित्त ‘बिलिअन स्टेप्स चॅलेंज’ हा उपक्रम राबविला आहे. त्याला जगभरातील कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमांतर्गत जगभरातील दोन लाख कर्मचारी वैयक्तिक आणि ग्रुपसोबत चालण्यासाठी, धावण्यासाठी बाहेर पडले.

‘टीसीएस’चा ‘बिलियन स्टेप्स चॅलेंज’ म्हणजे कंपनीने कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेण्यासाठी आखलेला सर्वांत  मोठा उपक्रम आहे. ‘टीसीएस’ची ५० वर्षे साजरी करण्यासाठी संपूर्ण संस्थेत राबवण्यात आलेल्या ‘टीसीएस५०’ या कार्यक्रमाचा हा भाग आहे. एका खास अॅपमध्ये लाखो पावलांची नोंद करण्यासाठी ‘टीसीएस’चे कर्मचारी वैयक्तिक आणि ग्रुपसोबत चालण्यासाठी, धावण्यासाठी बाहेर पडले. कंपनीतच बनवण्यात आलेल्या या अॅपमुळे कर्मचाऱ्यांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला.२८ सप्टेंबर ते सात ऑक्टोबर या काळात राबवण्यात आलेल्या या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद लाभला. ४८ देशांमधील दोन लाखांहून अधिक ‘टीसीएस’ कर्मचाऱ्यांनी  यात सहभागी होत ठरवलेल्या लक्ष्याच्या ३०० टक्के अधिकचा टप्पा गाठला.

‘टीसीएस’च्या ग्लोबल ह्युमन रिसोर्सेसचे ईव्हीपी आणि प्रमुख अजोय मुखर्जी म्हणाले, ‘जगभरात विविध ठिकाणी असलेले आमचे कर्मचारी या एका ध्येयाच्या पूर्ततेसाठी एकत्र आले ही बाब म्हणजे ‘#OneTCS’च्या उत्साहाचे, त्यातील तत्वांचे प्रतिक आहे. कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेणाऱ्या या उपक्रमांमुळे ‘टीसीएस’ ही एक प्रगतीशील व काम करण्याचा आनंद देणारी कंपनी ठरते आणि त्यामुळेच जगभरातील उत्कृष्ट प्रतिभेला ही कंपनी आकर्षून घेते आणि आपल्यासोबत जोडूनही घेते. जगभरातून ‘टीसीएस’मधील एकवाक्यतेचा हा स्वर म्हणजे ‘टीसीएस’च्या ५० वर्षांच्या प्रवासातील एक मैलाचा टप्पा आहे.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link