Next
पुण्याचे पवन सिंग चीनमधील पंचांना देणार धडे
चीनमध्ये जाऊन चीनी पंचांना प्रशिक्षित करणारे पहिलेच भारतीय प्रशिक्षक
प्रेस रिलीज
Friday, March 22, 2019 | 11:51 AM
15 0 0
Share this article:

पुणे : भारतीय राष्ट्रीय रायफल महासंघाचे (एनआरएआई) संयुक्त महासचिव, महासंघाच्या पंच समितीचे सदस्य, भारतीय नेमबाजीच्या संघाचे माजी प्रशिक्षक आणि पुण्यातील गन फॉर ग्लोरी या शूटिंग अकादमीचे सहसंस्थापक असलेल्या पुण्याच्या पवन सिंग यांची इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट्स फेडरेशनतर्फे (आयएसएसएफ) चीनमधील रायफल व पिस्टल पंचांना खास प्रशिक्षण देण्यासाठी निवड करण्यात आली आहे.

पुढील महिन्यात चीन येथे होत असलेल्या नेमबाजीच्या वर्ल्ड कपसाठी स्थानिक रेंज, जुरी ऑफिसर्स आणि सामन्यामधील पंचांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी ही पवन सिंग यांच्यावर असणार आहे. अशा पद्धतीने चीनमध्ये जाऊन नेमबाजी या खेळातील चीनच्या पंच, रेंज व ज्युरी अधिकाऱ्यांना प्रशिक्षित करणारे ते पहिलेच भारतीय प्रशिक्षक असणार आहेत.

चीनमधील बीजिंग शहरात २५ ते ३१ मार्च २०१९ दरम्यान हे प्रशिक्षण शिबिर होणार असून, यासाठी ‘आयएसएसएफ’ ज्युरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याच शिबिरात पवन सिंह हे चीनमधील नेमबाजी क्षेत्रातील स्थानिक पंच, रेंज व जुरी ऑफिसर्स यांना प्रशिक्षित करतील.

या विषयी बोलताना सिंग म्हणाले, ‘चीन हा नेमबाजीमध्ये अग्रेसर देश आहे. या ठिकाणी असलेल्या सुविधा या नेहमीच कोणत्याही खेळातील खेळाडूंसाठी महत्त्वपूर्ण आणि प्रोत्साहन देणाऱ्या ठरतात. या प्रशिक्षण शिबिराच्या निमित्ताने त्या देशातील खेळाडूंना प्रशिक्षित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धती मला जाणून घेता येतील. ज्याचा फायदा आपल्या देशातील खेळाडूंसाठी कशा पद्धतीने करता येईल याचादेखील मी अभ्यास करेन. याबरोबरच चीनसारख्या देशात प्रशिक्षण देण्यासाठी जाणारा पहिला भारतीय असल्याचाही मला अभिमान आणि आनंद आहे.’

नुकत्याच ‘आयएसएसएफ’च्या वतीने भारतात नेमबाजीच्या वर्ल्ड कप स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या वेळी या स्पर्धांचा लुक आणि फील बदलविण्यासाठी फायनल हॉलची जबाबदारी सिंग यांना देण्यात आली होती. सिंग यांनी केलेल्या बदलांचे कौतुक जागतिक स्तरावरदेखील झाले होते. या बरोबरच सिंग या वेळी स्पर्धा व्यवस्थापकदेखील होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search