Next
डॉ. आशा शेंडगे यांना १५ लाखांची फेलोशिप
संरक्षण क्षेत्रासाठी उपयुक्त संशोधनाची दखल
BOI
Thursday, November 22 | 06:02 PM
15 0 0
Share this story

डॉ. आशा शेंडगेपुणे :  देशाच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त ठरणाऱ्या संशोधनासाठी, केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या टीचर्स असोसिएशन फॉर रिसर्च एक्सलन्स (तारे) या योजनेअंतर्गत वाघोली येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिटयूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या प्राध्यापिका डॉ. आशा शेंडगे यांना १५ लाख रुपयांची फेलोशिप मिळाली आहे. डॉ. शेंडगे इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागात सहयोगी प्राध्यापक आहेत. 

‘मॉडेलिंग अँड परफॉर्मन्स इव्हॅल्युएशन ऑफ अ सॉफ्टवेअर डिफाइन फोटोनिक्स रडार’ या विषयावरील संशोधनासाठी तीन वर्षांसाठीची ही फेलोशिप आहे. डॉ. शेडगे यांचा विषय अतिशय महत्त्वपूर्ण असून, हे संशोधन देशाच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त आहे.  

या संशोधनामध्ये रायसोनी ग्रुपचे संचालक अजित टाटिया, प्राचार्य डॉ. आर. डी. खराडकर, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख  डॉ. वी. एम. पांचाडे यांचेही मार्गदर्शन व सहकार्य लाभले. 

यासह मेकॅनिकल विभागातील १२ विद्यार्थ्यांनी प्रा. एस. डी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नॅशनल प्रोग्रॅम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्सड लर्निंग (एनपीटीईएल) या ऑनलाइन कोर्ससाठी नोंदणी केली होती. त्यात अनिकेत अन्नदाते, आकाश शिंदे व शुभम सरवदे या तीन विद्यार्थ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link