Next
‘टीटीए’मध्ये फॅशन रिव्हर्स इंजिनिअरिंग कोर्स
प्रेस रिलीज
Friday, January 05 | 04:01 PM
15 0 0
Share this story

पुणे : ‘बाजीराव मस्‍तानी’, ‘रामलीला’ आणि ‘पद्‌मावती’सारख्या सुपरहिट चित्रपटांचे कॉस्‍च्‍युम डिझायनर आणि टाइम्‍स अँड ट्रेंड्स अकादमीमधील प्रमुख मार्गदर्शक चंद्रकांत सोनवणे यांनी होतकरू फॅशन डिझायनर्ससाठी ‘फॅशन रिव्हर्स इंजिनिअरिंग कोर्स’ सुरू करीत असल्‍याची घोषणा केली.

टाइम्‍स अँड ट्रेंड्स अकादमीचे संस्‍थापक अध्यक्ष अमित अग्रवाल यांनी फॅशन डिझायनिंग क्ष्रेत्रातील तज्‍ज्ञांच्या सहयोगाने या कोर्सच्या अभ्‍यासक्रमाची रचना केली आहे.  अमित म्हणाले, ‘आम्ही याबाबत बर्‍याच काळापासून काम करत होतो आणि शेवटी आम्‍ही आमची संकल्‍पना वास्‍तवात उतरवू शकलो. रिव्हर्स इंजिनिअरिंग कोर्स हे शैक्षणिक उद्योगाचे भविष्य आहे, कारण त्‍याद्वारे इच्छुक आणि होतकरू डिझायनर्सना, बॉलिवूडचे कॉस्‍च्‍युम डिझायनर चंद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बॉलिवूडमध्ये प्रत्‍यक्ष कामाचा अनुभव घेता येणार आहे.’

अमित पुढे म्हणाले, ‘उद्योगाशी थेट निगडीत असलेल्‍या बाबी होतकरू विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या दृष्‍टीने रचना केलेला हा अभ्यासक्रम अद्वितीय आहे. उद्योगामध्ये वापरल्‍या जाणार्‍या संकल्‍पनांचा अंतर्भाव करून एक सर्वसमावेशक अभ्‍यासक्रम तयार करण्यासाठी आमच्याकडे चंद्रकांत यांच्यासारखे तज्‍ज्ञ उपलब्‍ध होते. याचबरोबर आणखी जमेची बाजू म्‍हणजे हा अभ्‍यासक्रम अतिशय वेगवान आहे. अभ्यासक्रमाचा कालावधी दहा आठवडे आहे आणि मला वाटते की, टीटीएच्या फॅशन रिव्हर्स इंजिनिअरिंग कोर्सची वैशिष्‍ट्‍ये आणि लाभ यांच्या जवळपास जाणारा एकही अभ्‍यासक्रम उद्योगामध्ये उपलब्‍ध नसेल.’

चंद्रकांत सोनवणे चंद्रकांत म्हणाले, ‘विद्यार्थ्याने हा अभ्‍यासक्रम पूर्ण करताच, उद्योगाला अपेक्षित अशी सर्व कौशल्‍ये त्‍याच्याकडे असतील. फॅशन रिव्हर्स इंजिनियरिंग कोर्सच्या बॅचमधून मी माझ्या टीव्ही आणि चित्रपटांच्या प्रकल्‍पांसाठी विद्यार्थ्यांची निवड करणार आहे. यशस्‍वी फॅशन डिझायनर बनायचे असेल, तर विद्यार्थ्यांनी ही संधी सोडू नये आणि मला खात्री आहे की विद्यार्थ्यांना अशी संधी मिळालेली नक्‍कीच आवडेल.’

डेक्कन येथील टाईम्स आणि ट्रेंड्स अकादमीच्या कॉर्पोरेट सेंटरमध्ये, चंद्रकांत आणि अमित यांनी आयोजित केलेल्या फॅशनविषयक कार्यशाळेत सर्व तपशील देण्यात आला आहे.  दहा आठवड्यांचा फॅशन रिव्हर्स इंजिनिअरींग अभ्यासक्रम दोन जानेवारीपासून सुरू झाला रोजगार असणार्‍यांना किंवा इतर कोणताही फॅशन डिझाइनिंगचा अभ्‍यासक्रम करीत असलेल्‍या होतकरूंना सुलभतेने हा अभ्‍यासक्रम करता यावा यादृष्‍टीने हा अभ्यासक्रम शनिवार-रविवारच्या दिवशी चालविला जाणार आहे. या अभ्यासक्रमाला टीटीएच्या ई-लर्निंगचे पाठबळ आहे. विद्यार्थी वर्गातील व्याख्यान आणि इतर अभ्‍यासाचे साहित्‍य कोठूनही आणि केव्हाही मिळवू शकतील.

या अभ्‍याक्रमामध्ये सांघिक कार्य, संशोधन, चरित्र विकास, छायाचित्रण, आपत्‍कालीन व्यवस्थापन, प्रकल्प कार्य, तत्त्वज्ञान, वृत्ती, लक्ष्य, नेतृत्त्व, जीवनशैली, कम्युनिकेशन, प्रभाव, विपुलता, उत्पादकता आणि क्रिया ही प्रकरणे समाविष्‍ट आहेत.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link