Next
भा. द. खेर यांची जन्मशताब्दी; ‘मसाप’तर्फे विशेष कार्यक्रम
प्रेस रिलीज
Thursday, June 15, 2017 | 03:01 PM
15 0 0
Share this story

भा. द. खेरपुणे : कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, निबंध, चरित्र, चरित्रात्मक कादंबरी, कुमार वाङ्मय, संतचरित्रे अशा विविध वाङ्मयप्रकारांत लीलया संचार करताना आपल्या प्रतिभेची ठसठशीत नाममुद्रा उमटविणारे ख्यातनाम साहित्यिक आणि पत्रकार भा. द. खेर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

गुरुवार, २२ जून २०१७ रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 
यशवंतराव चव्हाण यांच्यासमवेत भा. द. खेर
माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या या विशेष कार्यक्रमात भा. द. खेर लिखित ‘लोकमान्य टिळक दर्शन’ या चरित्र ग्रंथाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. या समारंभाला विश्वशांती केंद्र आणि ‘माईर्स एमआयटी’चे अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभाला ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी, अरविंद गोखले, खेर यांचे सुपुत्र आणि प्रसिद्ध लेखक राजेंद्र खेर, ‘मसाप’चे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित राहणार आहेत. ‘मसाप’चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली. 

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते सत्कारखेर यांचा अल्प परिचय 
पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असताना सर्जनशील साहित्यिक म्हणून नावलौकिक मिळविणारे भा. द. खेर हे दैनिक केसरीचे सहसंपादक आणि ‘सह्याद्री’चे संपादक होते. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत या गावी झाला. १९३९ साली वकिलीची पदवी मिळवतानाच त्यांचा ‘नादलहरी’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला. १९६८पर्यंत त्यांच्या जवळपास पन्नास सामाजिक, कौटुंबिक कादंबऱ्या, चरित्रे आणि इतर पुस्तके प्रकाशित झाली. त्यांचे मामेबंधू, ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्याशी झालेल्या चर्चेतून ते चरित्रात्मक कादंबऱ्याकडे वळले. ‘यज्ञ’ ही त्यांची स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनावरील पहिली चरित्रात्मक कादंबरी. या कादंबरीच्या प्रकाशनापूर्वीच ११ हजार प्रतींची नोंदणी झाली होती. यज्ञ, अमृतपुत्र, चाणक्य, हसरे दुःख, कल्पवृक्ष, सारथी सर्वांचा, आनंदभवन, हिरोशिमा, प्रबुद्ध, गंधर्वगाथा, सेतुबंधन, श्री गजानन दर्शन, लोकमान्य टिळक दर्शन, संजीवन, तुका झाला पांडुरंग, क्रांतिफुले, समरसौदामिनी या त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृतींचे गारूड आजही रसिक वाचकांच्या मनावर कायम आहे. इंदिरा गांधींसोबत भा. द. खेरलालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावरची ‘अमृतपुत्र’ ही कादंबरी लिहिण्यासाठी यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना ताश्कंदला आणि ‘हिरोशिमा’ ही कादंबरी लिहिण्यासाठी जपानला राज्य अतिथी (स्टेट गेस्ट) या नात्याने पाठविले होते. त्यांच्या हिरोशिमा या कादंबरीची जपानच्या वृत्तपत्रांनीदेखील दखल घेतली होती. त्यांच्या अनेक कादंबऱ्या हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, जपानी भाषेत अनुवादित झालेल्या आहेत. ‘दी प्रिन्सेस’ या मनोहर माळगावकर लिखित सर्वाधिक जागतिक खपाच्या इंग्रजी कादंबरीचा अनुवाद भा. द. खेर यांनी केला होता. १९६५च्या दरम्यान या अनुवादित कादंबरीच्या १५ हजार प्रती संपल्या होत्या. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार, तसेच मानसन्मान लाभले होते. 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link