Next
‘टायटन आयप्लस’तर्फे ब्लू टेक लेन्सेस सादर
प्रेस रिलीज
Wednesday, September 05, 2018 | 05:16 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : टायटन आयप्लस या ऑप्टिकल रिटेल ब्रँडतर्फे ब्लू टेक लेन्स सादर करत असल्याचे जाहीर करण्यात आले. या उत्तम प्रतीच्या टेक लेन्समुळे एलईडी स्क्रीनच्या अतिरिक्त वापराचे डोळ्यांवर होणारे परिणाम रोखले जाणार असून, ते कमीत-कमी इजा पोचवणारे व्हावेत याची काळजी घेतली गेली आहे.

लॅपटॉप, फोन, किंडल आणि इतर अनेक उपकरणांच्या स्क्रीनमुळे गॅजेट सिंड्रोम वाढीस लागला आहे. याचा आयुष्याच्या दर्जावर परिणाम होत आहे. या युगात स्वतःला तंत्रज्ञानापासून लांब ठेवू शकत नाही, परंतु तंत्रज्ञानासाठी फिल्टरचा वापर मात्र करू शकता. यासाठी टायटन आयप्लसद्वारे सादर करण्यात आलेल्या ब्लू टेक लेन्स सादर करण्यात आली आहे. या उत्पादनामुळे तुमच्या डोळ्यांना हानीकारक असलेल्या किरणांना फिल्टर लावला जाईल.

डिजिटल क्षेत्राच्या वाढत्या व्याप्तीबद्दल अनेकदा चर्चा होते. तसेच निळ्या प्रकाशाबद्दलही विविध व्यासपीठांवरून चर्चा होते, हे परिणाम कमी व्हावेत यासाठी अनेक कंपन्या विविध उपाययोजना आणत आहेत. सूर्यप्रकाशात बाहेर जाणे, घरात भिंतीवरील दिवे लावणे, कॉम्प्युटर सुरू करणे, फोन किंवा इतर डिजिटल उपकरण सुरू करणे या सर्व गोष्टींमुळे डोळ्याला दिसणाऱ्या प्रकाशकिरणांचा त्रास होत असतो. डोळ्यावर ताण येणे, धूसर दिसणे, डोळे लाल होणे ही उपकरणांच्या अतिरिक्त वापरामुळे येणारी लक्षणे आहेत.

टायटन आय प्लसतर्फे सादर करण्यात आलेली नवीन ब्लू टेक लेन्स निळ्या किरणांपासून डोळ्यांना संरक्षण पुरवते. ओरखडा येत नाही, अँटी-ग्लेअर, अँटी-ब्लू कोटिंग आणि यूव्ही ३८० संरक्षण हे या लेन्सचे चार फायदे आहेत. सर्व ठिकाणी हे कोटिंग उपलब्ध आहे आणि ते सिंगल दृष्टी व उच्च क्षमतेच्या दृष्टीसाठी उपयुक्त ठरते.

तर टायटन आयप्लस लेन्सची अँटी-रिफ्लेक्टिव कोटिंग ९९.८ टक्के स्वच्छ दृष्टी देते. जळजळीतपणा आणि किरणांचे परावर्तन याबरोबरच स्क्रीनमधून उत्सर्जित होणाऱ्या हाय एनर्जी व्हिजिबल ब्लू लाइटसाठीही (एचईव्ही)संरक्षण देते. अँटी-ब्लू कोटिंगमुळे हानीकारक ब्लू लाइटचा परिणाम घटवण्यास मदत करते; मात्र चांगले ब्लू लाइट किरणांना प्रवेशही देते. याशिवाय यूव्ही-३८० कोटिंगमुळे संपूर्ण दिवसभर अतिनील किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण होते.

या वेळी टायटन कंपनी लिमिटेडच्या आयवेअर विभागाच्या मार्केटिंग प्रमुख शालिनी गुप्ता म्हणाल्या की, ‘टायटन आयप्लसने नेहमीच केवळ एक ऑप्टिकल ब्रँड बनून विक्रीवर भर देण्यापेक्षा ग्राहकांच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी मदत करण्याचे धोरण अवलंबले आहे. सध्या तंत्रज्ञानामुळे नवनवीन अडचणी उद्भवत आहेत. उपकरणांच्या अतिरिक्त वापरामुळे तुमच्या डोळ्यांवर येणाऱ्या ताणाला ब्लू टेक लेन्समुळे प्रतिबंध केला जातो, तसेच अतिनील किरणे आणि जळजळणे यासाठीही प्रतिबंध केला जातो. ग्राहकांना योग्य दृष्टी प्राप्त व्हावी, याबरोबरच हानीकारक घटकांना प्रतिबंध करावा, यासाठी आमच्या कंपनीने नेहमीच प्रयत्न केले आहेत.’

‘सर्व दुकानातील आमच्या २०-टप्प्यांच्या शून्य अडथळ्यांच्या नेत्र तपासणीसह, आम्ही ग्राहकांना दृष्टीमध्ये उद्भवणाऱ्या अडचणींचे निदान करणे आणि त्यास योग्य प्रतिबंध करणे असा शाश्वत फरकही प्रत्यक्षात देत आहोत, यासाठी आम्ही ब्लू टेक लेन्स सादर केल्या आहेत, डोळ्यांवरील ताणाला प्रतिबंध व्हावा यासाठी आम्ही हे पुढचे पाऊल टाकले आहे,’ असे गुप्ता यांनी नमूद केले.

एक हजार ९५ रुपयांच्या किंमतीच्या या ब्लू टेक लेन्स सध्या टायटन आयप्लसच्या सर्व दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. टायटन आयप्लसमध्ये ५०० पेक्षा जास्त स्टाइल्स उपलब्ध आहेत.

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search