Next
महिंद्रा लॉजिस्टिक्सने आणले टेंभा गावात पाणी
प्रेस रिलीज
Tuesday, August 28, 2018 | 05:51 PM
15 0 0
Share this article:

टेंभा गावातील पाणी प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी महिंद्रा लॉजिस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिरोजशा सरकारी व अन्य मान्यवर

मुंबई : महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. कंपनीने सामाजिक जबाबदारी उपक्रमाचा भाग म्हणून, शहापूरजवळच्या टेंभा (ठाकूरपाडा) या लहानशा गावामध्ये जल प्रकल्प स्थापन केला आहे. शहापूर या ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तालुक्यामध्ये उन्हाळ्याच्या काळात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व रहिवाशांचे आयुष्य सुधारण्यासाठी, महिंद्रा लॉजिस्टिक्सने टेंभा हे गाव दत्तक घेतले आहे. तिथे पायाभूत सुविधा विकास, शिक्षण, आरोग्य व व्यावसायिक मार्गदर्शन आदी विकासाचे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत.   

या प्रकल्पाचा भाग म्हणून, महिंद्रा लॉजिस्टिक्सने नजिकच्या जलस्रोतापर्यंत पाइपलाइन टाकली असून, तेथून पंपाने पाणी घेतले जाणार आहे. त्यानंतर, गावामध्ये बसवलेल्या वीस हजार लिटरच्या टाक्यांमध्ये हे पाणी साठवले जाणार आहे. या उपक्रमाचा लाभ अंदाजे ७५ कुटुंबांना मिळणार असून, यामुळे सध्याच्या पाण्याच्या टंचाईवर कायमस्वरूपी उपाय केला जाणार आहे.

महिंद्रा लॉजिस्टिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी पिरोजशा सरकारी म्हणाले, ‘महिंद्रा लॉजिस्टिक्समध्ये आम्ही समाजाचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो. वर्षभरापूर्वी आम्ही टेंभा गाव दत्तक घेतले. मानवतावादी, पर्यावरणीय व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून, आम्ही गावातील रहिवाशांच्या जीवनात सकारात्मक पद्धतीने बदल आणण्याचा प्रयत्न करतो. जल प्रकल्प हे या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.’

टेंभा गावाच्या सरपंच रेश्मा आमले म्हणाल्या, ‘महिंद्रा लॉजिस्टिक्स आम्हाला गावामध्ये सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी मदत करत असल्याने आम्ही कंपनीचे आभारी आहोत. आमच्यासाठी हा प्रकल्प म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यासारखे आहे. आमचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे. आम्हाला बादलीभर पाणी आणण्यासाठी दररोज दोन ते तीन किलोमीटर चालत जावे लागायचे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search