Next
‘अभिनय म्हणजे आभास निर्मितीची कला’
जेष्ठ अभिनेते व दिग्दर्शक विक्रम गोखले यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Saturday, June 22, 2019 | 02:21 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘अभिनय म्हणजे आभास निर्मितीची कला असून, अभिनय एवढा खोटा करायचा की तो खरा वाटला पाहिजे. ‘नकळत सारे घडले’ व ‘बॅरिस्टर’ ही नाटके करताना मला खूप मोठी आव्हाने होती; मात्र रंगमंच असो या चित्रपट स्वतःला झोकून देऊन काम करणे महत्त्वाचे आहे,’ असे प्रतिपादन जेष्ठ अभिनेते व दिग्दर्शक विक्रम गोखले यांनी केले.

विक्रम गोखले अॅक्टिंग अॅकॅडमीतर्फे गणेश कला क्रीडा रंगमंच येथे अभिनय कार्यशाळेबाबत चर्चासत्र व परिसंवादाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या प्रसंगी अभिनेत्री वर्षा उसगावकर, गिरीश परदेशी, मेघराजराजे भोसले व एच. आर. झूम फिल्मचे राजाराम कोरे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. 


या क्षेत्रात येताना स्वतःचा स्वतःवर विश्वास असणे महत्त्वाचे असून, अभिनयातील बारकावे व छोट्या छोट्या गोष्टी शिकणे अत्यंत गरजेचे असल्याचे गोखले यांनी नवोदितांना मार्गदर्शन करताना सांगितले.

वर्षा उसगावकर म्हणाल्या, ‘एक उत्तम अभिनेत्री बनायचे असेल, तर मुळात उपजत त्या व्यक्तीमध्ये काही गुण असणे आवश्यक असते. महिलांसाठी चित्रपटसृष्टीत वातावरण अनुकूल आणि सुरक्षित आहे; मात्र मुलींनी या क्षेत्रात येताना स्वतःची काळजी स्वतः घ्यायला हवी. खबरदारी म्हणून तुमच्यासोबत आपल्या पालकांना अथवा जवळच्या व्यक्तीला सोबत असेल, तर फारच उत्तम गोष्ट आहे.’ 


गिरीश परदेशी म्हणाले, ‘‘या सुखांनो’ ही मालिका करताना मला विक्रम गोखले यांची खूप मदत झाली. व्यावसायिक अभिनेता बनण्यासाठी त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केले. अभिनयाबरोबरच विक्रम गोखले हे उत्तम व्यक्ती आहेत. त्याच बरोबर ते चालते बोलते विद्यापीठ आहेत. त्यांच्या सानिध्यात राहीलो, तरी खूप गोष्टी शिकायला मिळतात. या शिवाय चित्रपट महामंडळाला त्यांची वारंवार मदत आहे.’

या कार्यशाळेला पुणे व पुणे परिसरातील नवोदित कलाकारांनी उदंड प्रतिसाद दिला. या कार्यशाळेचे व परिसंवादाचे सूत्रसंचालन मिलिंद शिंत्रे यांनी केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search