Next
‘गिरिप्रेमी’च्या कांचनजुंगा शिखरवीरांचा नागरी सन्मान
रविवारी ‘गिरिप्रेमी’तर्फे खास कार्यक्रमाचे आयोजन
BOI
Saturday, May 25, 2019 | 03:47 PM
15 0 0
Share this article:


पुणे : गिरिप्रेमी संस्थेतील १० गिर्यारोहकांनी १५ मे रोजी पहाटे जगातील तिसरे उंच शिखर माउंट कांचनजुंगावर यशस्वी चढाई करून भारताच्याच नव्हे, तर जगातील गिर्यारोहण इतिहासात नवा अध्याय रचला. गिरिप्रेमीने यशस्वी केलेली ही मोहीम कांचनजुंगा शिखर चढाई करण्यात यशस्वी ठरलेली सर्वात मोठी व सर्वात पहिली नागरी मोहीम ठरली आहे. 

ही अद्भुत कामगिरी करणारे गिर्यारोहक व त्यांचे मोहीम नेते उमेश झिरपे हे रविवारी, २६ मे २०१९ रोजी पुण्यात दाखल होणार असून, त्यांचा नागरी सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. 


२०१२ पासून गिरिप्रेमी संस्थेने उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वोच्च १४ पैकी ७ अष्टहजारी शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. यात माउंट एव्हरेस्ट व माउंट कांचनजुंगा या शिखरांचा समावेश आहे. अशी कामगिरी करणारे झिरपे हे भारतातील एकमेव गिर्यारोहण नेते ठरले आहेत. त्यांनी या वेळी गिरिप्रेमीच्या कांचनजुंगा शिखर मोहिमेच्यावेळी कांचनजुंगा शिखर चढाईला आलेल्या सर्व आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक संघाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. त्यांना व शिखर चढाई करणाऱ्या दहाही गिर्यारोहकांना जे मोहिमेदरम्यान अनुभव आले, त्यांचे कथन सन्मान सोहळ्याच्यावेळी करणार आहेत. या मोहिमेची उत्कंठावर्धक माहिती जाणून घेण्यासाठी सर्व पुणेकरांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन गिरिप्रेमी संस्थेने केले आहे. 

कार्यक्रमाविषयी :
कांचनजुंगा शिखरवीरांचा स्वागत व सन्मान सोहळा
स्थळ : आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे सभागृह. 
दिवस व वेळ : रविवार, २६ मे, संध्याकाळी सहा वाजता. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search