पुणे : येथील ‘बलराज साहनी आणि साहिर लुधयानवी फांऊडेशन’च्या वतीने गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या नावे दिला जाणारा ‘सुलतानपुरी’ पुरस्कार कवी स्वप्निल पोरे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते गीतकार मजरूह सुलतानपुरी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा पुरस्कार देण्यात आला. या वेळी दिपक सोनार, सुरेश टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
‘मजरूह सुलतानपुरी हे ऊर्दू कवी होते. हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांचे महत्त्वाचे योगदान असून, ‘दिल देके देखो’, ‘चलती का नाम गाडी’, यांसारख्या कैक लोकप्रिय चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. त्यांच्या गाण्यांमुळे माझ्या आयुष्याला वेगळी दिशा मिळत असून त्यांच्या नावाचा पुरस्कार मला मिळाला, याचा खूप आनंद आहे’, अशा भावना कवी स्वप्निल पोरे यांनी या वेळी व्यक्त केल्या.