Next
‘सीएमडीए’च्या अध्यक्षपदी कौसर दाभिया
नवीन कार्यकारिणी जाहीर
BOI
Tuesday, July 23, 2019 | 10:10 AM
15 0 0
Share this article:

कौसर दाभियापुणे : देशातील एकमेव आयएसओ प्रमाणित आयटी ट्रेड असोसिएशन, कॉम्प्युटर अँड मीडिया डीलर्स असोसिएशनच्या (सीएमडीए) अध्यक्षपदी कौसर दाभिया यांची निवड करण्यात आली आहे. 

संघटनेच्या नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये वर्ष २०१९-२० साठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. संघटनेच्या सचिवपदी मंगेश भालेराव यांची, उपाध्यक्षपदी राहुल हजारे, सहसचिवपदी मुजफ्फर इनामदार तर, खजिनदारपदी चिंतामणी कुबेर यांची निवड करण्यात आली आहे. समिती सदस्यांमध्ये नितीन कुलकर्णी, विशाल मोहन काळे, प्रशांत महाडिक, प्रविण हेबरे आणि रविकुमार शेट्टी यांचा समावेश असून, सल्लागार समितीमध्ये योगेश गोडबोले, नरेंद्र भेडा आणि नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे.

मंगेश भालेराव
या वेळी बोलताना ‘सीएमडीए’चे नवनिर्वाचित अध्यक्ष कौसर दाभिया म्हणाले, ‘‘सीएमडीए’ २७ वर्षे जुनी आयटी संस्था आहे. प्रत्येक वर्षी सदस्य व नागरिकांकरिता विविध कार्यक्रम व मोहीमा राबविल्या जातात. आमचा प्रसिध्द आयटी एक्स्पो उपक्रम प्रसिद्ध असून, आयटीमधील तंत्रज्ञानातील नवीन ट्रेंडस प्रदर्शित करण्याचे ते महत्त्वाचे व्यासपीठ आहे. याबरोबरच सामाजिक पुढाकाराचा एक भाग म्हणून ‘सीएमडीए’ गरजू सामाजिक संस्था आणि शैक्षणिक संस्थांना आयटी उत्पादने पुरविते. याबरोबरच ‘सीएमडीए’ने ई-वेस्ट कलेक्शन ड्राईव्हच्या माध्यमातून शहरातील २० ठिकाणी ई-वेस्ट संकलन केंद्रे सुरू केली आहेत. हा ई-कचरा विघटनासाठी अधिकृत रिसायक्लर्सकडे पाठविण्यात येतो’.

‘सीएमडीए’ व्यवसायाशी निगडीत समस्यांचे निराकरण करण्यासाठी सक्रीयपणे कार्यरत असून, सदस्यांना स्पर्धात्मक होण्यासाठी आवश्यक ती कौशल्ये मिळविण्यात मदत करत आहे. ‘सीएमडीए’ आपल्या सदस्यांकरिता ट्रेड इन्श्युरन्सवर काम करत असून, सदस्यांकरिता आर्बिट्रेशन पॉलिसीदेखील तयार करत आहेत. सदस्यांना उत्तम व्यावसायिक होण्यास मदत करणारे आणि समाजाप्रती आपल्या भूमिकेबाबत अधिक सजग बनवणारे उपक्रम राबवण्यावर आम्ही भर देणार आहोत,’असेही दाभिया यांनी नमूद केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search