Next
अॅक्टिव्हा फाइव्ह-जी, सीबी शाइनची मर्यादित आवृत्ती सादर
प्रेस रिलीज
Thursday, May 30, 2019 | 01:51 PM
15 0 0
Share this article:


नवी दिल्ली : ‘होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया’तर्फे अॅक्टिव्हा फाइव्ह-जी आणि सीबी शाइन या आपल्या प्रमुख गाड्यांची मर्यादित आवृत्ती सादर केली आहे.

अॅक्टिव्हा फाइव्ह-जीच्या मर्यादित आवृत्तीमध्ये १० नव्या, प्रीमियम स्टाइल्सचा समावेश करण्यात आला असून, ती पर्ल प्रेशियस व्हाइट विथ मॅट सेलेन सिल्व्हर आणि स्ट्रोन्टियम सिल्व्हर मेटॅलिक विथ पर्ल इग्निस ब्लॅक अशा दुहेरी रंगांत उपलब्ध होईल. सीबी शाइनच्या मर्यादित आवृत्तीमध्ये पाच नव्या प्रीमियम स्टाइल्सचा समावेश करण्यात आला असून, ती ब्लॅक विथ इम्पेरियल रेड मेटॅलिक आणि ब्लॅक विथ स्पियर सिल्व्हर मेटॅलिक अशा आकर्षक, दुहेरी रंगांत उपलब्ध होईल. 

या प्रसंगी बोलताना ‘होंडा मोटारसायकल अँड स्कूटर’च्या विक्री आणि विपणन विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले, ‘ग्राहकांनी दाखवलेल्या जिव्हाळ्यामुळे ‘होंडा’ हा भारतातील सर्वांत विश्वासार्ह दुचाकी ब्रँड ठरला आहे. अॅक्टिव्हा आणि सीबी शाइन या भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या मॉडेल्सचा वारसा साजरा करण्यासाठी ‘होंडा’ने उत्सुकता नव्या पातळीवर नेण्याचे ठरवले आहे. आम्ही ग्राहकांसाठी अॅक्टिव्हा फाइव्ह-जी आणि सीबी शाइन यांच्या रूपाने आश्चर्याचा दुहेरी धक्का देत आहोत.’

अॅक्टिव्हा फाइव्ह-जी मर्यादित आवृत्तीला नव्या स्टायलिश ग्राफिक्ससह प्रीमियम स्टाइल कर्ट्सी देण्यात आली आहे. काळ्या रिम्स, क्रोम मफलर कव्हर, पूर्णपणे काळ्या रंगाचे इंजिन यांचा त्यात समावेश केला आहे. ग्रॅब टेल, इनर इंटेरियर कव्हर आणि सीट कॉन्ट्रास्ट रंगात उपलब्ध करण्यात आले आहे. ही गाडी पर्ल प्रेशियस व्हाइट विथ मॅट सेलेन सिल्व्हर आणि स्ट्रोन्टियम सिल्व्हर मेटॅलिक विथ पर्ल इग्निस ब्लॅक अशा दुहेरी रंगांत उपलब्ध केली जाणार आहे. अॅक्टिव्हा फाइव्ह-जीच्या मर्यादित आवृत्तीची प्रारंभिक किंमत ५५ हजार ३२ रुपये (एक्स शोरूम दिल्ली) इतकी आहे.

सीबी शाइन मर्यादित आवृत्तीला नव्या ग्राफिक्सच्या मदतीने स्टाइल देण्यात आली आहे. डायनॅमिक कलर्ड थीम ग्रॅब रेल, मॉडर्न साइड काउल आणि बोल्ड ड्युएल टोन टँक, स्टनिंग डिकॅलसह मोटरसायकलला स्टाइलिश रूप देणारा आहे. ही गाडी ब्लॅक विथ इम्पेरियल रेड मेटॅलिक आणि ब्लॅक विथ स्पियर सिल्व्हर मेटॅलिक अशा दुहेरी रंगांत उपलब्ध होईल. या गाडीच्या मर्यादित आवृत्तीची प्रारंभिक किंमत ५९ हजार ८३ (एक्स शोरूम दिल्ली) इतकी आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search