Next
‘सिबिल’तर्फे ‘अनलिमिटेड अॅक्सेस’ सुविधा
प्रेस रिलीज
Thursday, March 01, 2018 | 12:48 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘ट्रान्सयुनियन सिबिल’ या भारतामधील प्रख्यात क्रेडिट माहिती कंपनीने ‘अनलिमिटेड अॅक्सेस’ ही नवीन सुविधा दाखल केली आहे. यामुळे भारतीय ग्राहकांना त्यांचे ‘सिबिल’ गुणांकन आणि पतअहवाल तातडीने मिळणार आहे. 

‘सिबिल’च्या  ग्राहक संपर्क विभागाचे अध्यक्ष ऋषीकेश मेहता यांनी ग्राहकांच्या क्रेडिट सवयींमध्ये बदल झाल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘सिबिल’च्या आकडेवारीनुसार २०१३ पासून २०१७ पर्यंत ‘क्रेडिट’ चौकशीमध्ये तिपटीने वाढ झाली आहे.आमच्याकडील ३१ टक्के ग्राहक हे आपले ‘सिबिल’ गुणांकन आणि अहवाल पाहून तीन महिन्यांच्या आत कर्ज अर्ज दाखल करतात, तर २५ टक्के ग्राहक आपल्या थकबाकीची पूर्तता करतात.ग्राहकांना आपले कर्जविषयक निर्णय घेण्यासाठी आपल्या ‘क्रेडिट’ची माहिती असणे गरजेचे असते. चांगले ‘सिबिल’ गुणांकन असल्यास ग्राहकांना उत्तम ‘क्रेडिट’ संधी मिळू शकतात.’

‘सिबिल’च्या धोरणानुसार वेगवान आणि स्वस्त ‘क्रेडिट’ सेवा पुरविण्यासाठी ‘अनलिमिटेड अॅक्सेस’तर्फे ग्राहकांना त्यांचे पतव्यवहार आणि एकूणच पतपाहणी ‘सिबिल’ गुणांकन आणि अहवालाद्वारे दररोज करता येते; तसेच कर्ज अर्ज सादर करण्यापूर्वी ‘सिबिल’ गुणांकन न पाहता ग्राहकांना आता थेट ‘अनलिमिटेड अॅक्सेस’द्वारे आपले गुणांकन आणि वित्तीय व्यवहार कळणार आहेत.

सिबिल’च्या मोठ्या गुणांकनांच्या लाभांबद्दल ऋषीकेश मेहता म्हणाले, ‘काही कर्जदारांना आम्ही त्यांच्या गृहकर्जात १ टक्क्याची सूट देत आहोत. त्याचा लाभ गृहकर्जावरील हप्त्याची रक्कम घटण्यासाठी होणार आहे. ‘अनिलिमिटेड अॅक्सेस’मुळे ग्राहकांना आपली ध्येयपूर्ती करता येणार आहे. तसेच अशाप्रकारच्या सुविधांसाठी तयार राहता येणार आहे.’

‘अनलिमिटेड अॅक्सेस’मुळे ग्राहकांना त्यांचे ‘सिबिल’ मानांकन आणि अहवाल तातडीने प्राप्त होणार आहे. त्यांना आपले ‘क्रेडिट’ समजणार असून त्या दृष्टीने कर्जाबाबतच्या ऑफर्सची पडताळणी करता येणार आहे. या प्रणालीमुळे ‘क्रेडिट हेल्थ’ सुधारण्यात मदत होणार आहे;तसेच ग्राहकांना त्यांचे ‘सिबिल’ गुणांकन पाहण्यासाठी आवाहनही केले जाणार आहे. या प्रणालीमुळे ग्राहकांना आपल्या ‘क्रेडिट’ची अगदी सहजपणे माहिती मिळणार आहे. या प्रणालीचा लाभ ‘क्रेडिट हेल्थ’बद्दल जागरूकता, ग्राहक डाटा संरक्षणासाठीही होणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search