Next
‘हॅप्पी व्हॅली रोड’ होणार हिरवागार
स्थानिकांसह ‘अमोल जामदार फाउंडेशन’कडून वृक्षारोपण
BOI
Monday, June 24, 2019 | 06:12 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : मानपाडा येथील ‘हॅप्पी व्हॅली’ ते ‘नीलकंठ ग्रीन रोड’च्या दुतर्फा, स्थानिक गृहसंकुलातील रहिवाशांसह ‘अमोल जामदार फाउंडेशन’च्या वतीने वृक्षारोपन करण्यात आले. कार्यक्रमाला ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी उपस्थिती नोंदवत स्थानिकांच्या कृतीला बळ दिले. यंदाच्या पावसाळ्यात या नव्या रोपट्यांनी बाळसे धरताच ‘हॅप्पी व्हॅली’ ते ‘नीलकंठ ग्रीन रोड’ नावाप्रमाणेच हिरवागार होणार आहे. 

आंब्यांच्या कोयी, विविध फळांच्या बिया, गॅलरीतील कुंडीत वाढलेल्या मोठमोठ्या रोपांसह औषधी व बहुपयोगी झाडे अशा कितीतरी झाडांचा या वृक्षारोपणात समावेश होता. मानपाडा येथील टिकुजीनीवाडी परिसरात नवनवीन गृहसंकुले उभी राहत असताना काही वर्षांपूर्वी रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले होते. मात्र हॅप्पी व्हॅली ते नीलकंठ ग्रीन रोड दोन्हीं बाजूला पुरेशी मोकळी जागा असल्याने हा परिसर हिरवागार करण्याचा निर्धार मानपाडावासियांसह अमोल जामदार फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. त्यानुसार वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या अंकिता जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात वृक्षारोपण अभियान राबवण्यात आले. 

या वेळी हॅप्पी व्हॅली, शुभारंभ, सहयोग गृहनिर्माण संस्था, शिगवण प्रतिष्ठान, नव संकल्प प्रतिष्ठान या गृहसंकुलाचे सदस्य व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी आंबा, पेरू, कडुनिंब, बहावा अशा झाडांचे रोपण केले. याप्रसंगी ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांनी उपस्थिती लावून या कार्याला प्रोत्साहन दिले आणि या निर्धाराचे स्वागत केले.  

या वेळी ठाणे शहर शिवसेना सहकार विभागाचे संपर्क प्रमुख अमोल जामदार, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्या अंकिता जामदार, अमोल जामदार फाउंडेशनचे सचिव अक्षय जामदार, ठाणे शहर भाजप अध्यक्ष संदीप लेले, स्थानिक नगरसेवक मुकेश मोकाशी, चितळसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपतराव पिंगळे, महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाच्या महिला प्रमुख रिदा रशीद, शिवसेना शाखाप्रमुख प्रल्हाद बोरसे, महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मयुरेश जोशी, ठाणे शहर सरचिटणीस सारंग मेढेकर, मनसेचे शाखाध्यक्ष संतोष निकम, गोकुळ बोरसे, स्वप्निल महिंद्रकर, निखिल जाधव, देवेंद्र कदम, शैलेंद्र चिकलकर, सूरज दळवी, मत्स्यगंधा पवार, संदीप माने, मिहीर म्हात्रे, ओंकार पवार, श्रीकांत राजपूत, चेतन कारंडे, देवराज पाटील, आनंद कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search