Next
पीटर ओ-टूल, मर्ना लॉय
BOI
Thursday, August 02, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

आपल्या जबरदस्त अभिनयाने गाजलेला अभिनेता पीटर ओ-टूल आणि देखणी अभिनेत्री मर्ना लॉय यांचा दोन ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय....
.......
पीटर ओ-टूल

दोन ऑगस्ट १९३२ रोजी यॉर्कशरमध्ये जन्मलेला पीटर ओ-टूल हा शेक्सपीरियन रंगभूमीवरचा अभिनेता, जो पुढे हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयामुळे गाजला. त्याला एकंदर नऊ वेळा ऑस्कर नामांकनं मिळाली आणि एकदा ऑस्कर मिळालं होतं. याखेरीज त्याला तीन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार, एकदा एमी पुरस्कार आणि दोनदा बाफ्टा पुरस्कार मिळाले होते. सुरुवातीच्या काळात रंगभूमीवर अभिनय करत असतना, बर्नार्ड शॉच्या मेजर बार्बरा आणि शेक्सपिअरच्या दी मर्चंट ऑफ व्हेनिस, दी तेमिंग ऑफ दी श्र्यू आणि हॅम्लेट या नाटकांमधल्या त्याच्या भूमिका गाजल्या होत्या. १९६० सालच्या ‘किडनॅप्ड’मधून त्याने हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि लगोलग १९६२ साली आलेल्या दिग्दर्शक डेव्हिड लीनच्या अतिभव्य ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ सिनेमातल्या टी. ई. लॉरेन्सच्या भूमिकेने त्याला रातोरात इंटरनॅशनल स्टार बनवलं. बेकेट, लॉर्ड जिम, दी लायन इन विंटर, दी रुलिंग क्लास, दी लास्ट एम्परर, विंग्ज ऑफ फेम, फेअरी टेल : ए ट्रू स्टोरी, व्हीनस, गुडबाय मिस्टर चिप्स, माय फेव्हरिट इयर असे त्याचे महत्त्वाचे सिनेमे होते. १४ डिसेंबर २०१३ रोजी त्याचा लंडनमध्ये मृत्यू झाला. 
.......  

मर्ना लॉय

दोन ऑगस्ट १९०५ रोजी मोन्टानामध्ये जन्मलेली मर्ना लॉय ही रंगमंच, टेलिव्हिजन आणि सिनेमा अशा तिन्ही माध्यमांमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री. मॅनहॅटन मेलोड्रामा आणि दी थिन मॅन हे तिचे सुरुवातीचे गाजलेले सिनेमे. अभिनेता विल्यम पॉवेलबरोबर तिची विशेष जोडी जमली आणि त्यांनी तब्बल १४ सिनेमे एकत्र गाजवले. दी मास्क ऑफ फू मांचू, लव्ह मी टुनाइट, दी ग्रेट झिगफिल्ड, टेस्ट पायलट, आय लव्ह यू अगेन, लव्ह क्रेझी, दी बेस्ट इयर्स ऑफ अवर लाइव्ह्ज, दी रेड पोनी, चीपर बाय दी डझन असे तिचे अनेक सिंनेमे गाजले होते. तिला ऑनररी ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. १४ डिसेंबर १९९३ रोजी तिचा न्यूयॉर्कमध्ये मृत्यू झाला.
........    
यांचाही आज जन्मदिन :
प्रसिद्ध कवी, कथाकार आणि कादंबरीकार पु. शि. रेगे (जन्म : दोन ऑगस्ट १९१०, मृत्यू : १७ फेब्रुवारी १९७८) 
आफ्रिकन लोकांच्या वाट्याला येणाऱ्या जीवनाविषयी तळमळीने लिहिणारे जेम्स बॉल्डविन (जन्म: दोन ऑगस्ट १९२४, मृत्यू:एक डिसेंबर १९८७)
जगातली सर्वांत लोकप्रिय स्पॅनिश लेखिका इसाबेल अजेंडे (जन्म:दोन ऑगस्ट १९४२)

यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link