Next
‘महिंद्रा’च्या नव्या वाहनाचे नाव ‘एक्सयूव्ही ३००’
प्रेस रिलीज
Friday, December 21, 2018 | 11:40 AM
15 0 0
Share this story

मुंबई : महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड (एमअँडएम) कंपनीने मोठ्या प्रतीक्षेत असणाऱ्या आपल्या नव्या एस२०१ असे कोडनेम असणाऱ्या वाहनाचे नाव ‘एक्सयूव्ही ३००’ जाहीर केले आहे.

एक्सयूव्ही ३ डबल ‘Oh’ असा उच्चार असलेल्या ‘एक्सयूव्ही ३००’ने २०१५मध्ये दाखल झाल्यापासून ५० हून अधिक देशांत दोन लाख ६० हजार वाहनांची विक्री करणाऱ्या सांगयोंग तिवोली या जगभर प्रसिद्ध असणाऱ्या उत्पादनाच्या तोडीचे स्थान मिळवले आहे. तिवोलीनेही सुरक्षा व अर्गोनॉमी यासाठी विविध पुरस्कार जिंकले आहेत. चित्त्यापासून प्रेरित डिझाइन, चित्त्यासारखी चपळता, थरारक कामगिरी व आधुनिक तंत्रज्ञानाची वैशिष्ट्यांमुळे ‘एक्सयूव्ही ५००’चे गुणविशेष कायम ठेवण्यात आले आहेत.

‘एक्सयूव्ही ३००’चे हेडलॅम्प फॉग लॅम्पशी एकात्मिक होत असल्याने चित्त्याप्रमाणे टिअर-डक्ट दिसून येते, तर व्हील आर्क चित्त्याच्या मागील भागापासून प्रेरित आहेत. आधुनिक ग्रिल, स्कल्पेड बॉनेट, दणकट शोल्डर व बॉडीलाइन यांमुळे ‘एक्सयूव्ही ३००’ रस्त्यावर आकर्षक दिसते. याबरोबर, ड्युएल एलईडी डीआरएल व ठळक एलईडी टेल लॅम्पमुळे गाडीचे रूप अधिक खुलून तिची खास ओळख निर्माण होण्यास मदत होत आहे.

वाहनाच्या नामकरणप्रसंगी बोलताना ‘एमअँडएम’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका म्हणाले, ‘मराझ्झो व अल्तुरास जीफोर या वाहनांनंतरची, महिंद्रा वाहनांच्या अत्याधुनिक वाहनांमधली ‘एक्सयूव्ही ३००’ ही नवी गाडी आहे. आमच्या नव्या गाड्या उत्कृष्ट इंजिनीअरिंगमधून निर्माण झाल्या आहेत आणि त्या जागतिक व्यासपीठावर तयार करण्यात आल्या आहेत. ‘एक्सयूव्ही ५००’ने ग्राहकांच्या मनात स्थान मिळवले आहे आणि आता ‘एक्सयूव्ही ३००’च्या निमित्ताने ‘एक्सयूव्ही’ या ब्रँडने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वाहनांचा संपूर्ण परिवारच सादर केला आहे.’
 
‘एमअँडएम’चे ऑटोमोटिव्ह सेक्टरचे अध्यक्ष राजन वधेरा म्हणाले, ‘हे पूर्णतः नवे उत्पादन असून ते जागतिक व्यासपीठावर साकारलेले आहे आणि त्यामध्ये या श्रेणीतील अनेक पहिलीवहिली वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. ‘एक्सयूव्ही ३००’चे आकर्षक, चित्त्यापासून प्रेरित असलेले डिझाइन, गाडी चालवण्याचा पुरेपूर आनंद देणारी कामगिरी, या श्रेणीतील सर्वोत्तम सुरक्षितता आणि या श्रेणीत उठून दिसणारा अंतर्भाग यामुळे ही गाडी आकर्षक व सर्वंकष असे परिपूर्ण पॅकेज ठरते आणि ते ग्राहकांना नक्की आवडेल. आम्ही ‘एक्सयूव्ही ३००’ पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही पर्यायांत उपलब्ध करणार आहोत.’

‘एक्सयूव्ही ३००’चे उत्पादन महाराष्ट्रातील नाशिक येथील कंपनीच्या उत्पादन प्रकल्पामध्ये केले जाणार असून, ही गाडी फेब्रुवारी २०१९ पर्यंत दाखल केली जाणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link