Next
मेंढापूरच्या यात्रेत चांगल्या पावसाचे भाकीत
BOI
Wednesday, April 10, 2019 | 01:07 PM
15 0 0
Share this article:



सोलापूर :
सोलापूर जिल्ह्यातील मेंढापूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल बिरुदेवाची यात्रा नुकतीच उत्साहात पार पडली. धनगरी ओव्या व तलवारीची परज पाहण्यासाठी भाविकांनी या वेळी मोठी गर्दी केली होती. ‘विठ्ठल बिरुदेवाचं चांगभलं’च्या गजराने आसमंत दणाणून गेला होता. या वेळी पावसाची भाकणूक करण्याची परंपरा असून, पुजारी भागवत बंडगर यांनी यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकीत केले. 



चैत्र महिन्यातील पहिल्या रविवारी श्री विठ्ठल बिरुदेवाची यात्रा भरत असते. त्यासाठी मेंढापूरसह रोपळे, खरातवाडी, पांढरेवाडी, लक्ष्मीटाकळी, तिसंगी, टाकळी सिकंदर व मारापूर या भागातील भाविक मोठ्या संख्येने आले होते. या यात्रेत केली जाणारी पावसाची भाकणूक ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भागवत बंडगर यांनी यंदा सर्वत्र चांगला पाऊस होणार असल्याचे भाकित केले. 



मंदिरासमोर भक्तांनी धनगरी ओव्या व विविध खेळ सादर केले. त्यानंतर तलवारीची परज खेळण्यात आली. नारायण बंडगर यांनी पहिल्यांदा तलवारीची परज खेळून इतरांना तलवारीची परज खेळण्याचा मान दिला. यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सायंकाळी श्रींच्या छबिन्याच्या मिरवणुकीनंतर भाकणूक झाली. यंदा चांगला पाऊस पडणार असल्याचे भाकीत होताच भाविकांनी आनंद व्यक्त केला आणि ‘विठ्ठल बिरुदेवाचं चांगभलं’ असा गजर केला.

(धनगरी ओव्या आणि भाकणुकीचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search