Next
स्मार्टफोन बाजारातील ‘शाओमी’ची आघाडी कायम
प्रेस रिलीज
Monday, August 20, 2018 | 04:53 PM
15 0 0
Share this story

मुंबई : आयडीसीचे  नवीन त्रैमासिक ‘स्मार्टफोन ट्रॅकर क्यूई२-२०१८’च्या अहवालानुसार, २०१८च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये ‘शाओमी इंडिया’ने भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेतील पहिल्या क्रमांकाचे स्थान कायम राखले आहे. ‘शाओमी इंडिया’ने २०१८च्या दुसऱ्या तिमाहीत स्मार्टफोन बाजारपेठेतील  २९.७ टक्के हिस्सा मिळवला आहे. 

भारतात विकल्या जाणाऱ्या तीनपैकी एक स्मार्टफोन शाओमीचा आहे. या एकाच तिमाहीत सुमारे एक कोटी युनिट पाठवणारा हा पहिला स्मार्टफोन ब्रँड ठरला आहे. आर्थिक वर्ष २०१७च्या तिसऱ्या तिमाहीपासून सलग चार तिमाही शाओमी हा पहिल्या क्रमांकाचा स्मार्टफोन व्हेंडर ठरला आहे. ऑनलाइन स्मार्टफोन बाजारपेठेतही ‘शाओमी’ ५५.६ टक्के हिश्श्यासह सलग सातव्या वर्षी पहिल्या क्रमांकाचा स्मार्टफोन व्हेंडर ठरला आहे. शाओमी आर्थिक वर्ष २०१७ची दुसरी तिमाही ते आर्थिक वर्ष २०१८च्या दुसऱ्या तिमाहीच्या कालावधीत १०७.६ टक्के दराने वाढला असून, हा टॉप ५ मधील सर्वाधिक वेगाने वाढणारा ब्रँड ठरला आहे.

आर्थिक वर्ष २०१८च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये सर्वोत्तम पाचपैकी चार स्मार्टफोन्स शाओमीचे होते- रेडमी ५ए, रेडमी नोट ५ प्रो, रेडमी नोट ५ व रेडमी ५ सात महिन्यांनंतर रेडमी ५ए हा पहिल्या क्रमांकाचा विकला जाणारा स्मार्टफोन ठरला असून, एका तिमाहीत तीन दशलक्षहून अधिक फोनची शिपमेंट झाली.  

मनू जैन
 शाओमीचे उपाध्यक्ष आणि शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू जैन म्हणाले, ‘हा शाओमी इंडियासाठी अभिमानाचा क्षण आहे, कारण सलग चौथ्या तिमाहीत आम्ही भारतातील पहिल्या क्रमांकाचे स्मार्टफोन व्हेंडर ठरलो आहोत. लाखो एमआय फॅन्सकडून आम्हाला मिळालेले प्रचंड प्रेम आणि सहकार्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत. त्यांनी प्रत्येक टप्प्यावर आमच्यावर विश्वास ठेवला आहे. वाजवी किंमतीत उत्तम दर्जाची उत्पादने देण्याच्या आमच्या स्वप्नामुळे लोकांचे आयुष्य बदलले आहे. भारतात मोबाइल इंटरनेटच्या क्षेत्रात एक नवीन युग सुरू झाले आहे. माझा विश्वास आहे की, आम्ही लोकांच्या आयुष्याचा आणखी एक मोठा भाग होऊ कारण आम्ही आमची उत्पादने, बिझनेस मॉडेल व साधनसुविधा यांच्यातील सातत्यपूर्ण नवीन संशोधनाद्वारे ग्राहकांचा विश्वास आणि कौतुक मिळवले आहे.’  
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link