Next
अनाथ मुलांच्या आहारासाठी ‘मिरॅकल फाऊंडेशन’चा उपक्रम
BOI
Saturday, March 02, 2019 | 06:07 PM
15 0 0
Share this story

मुंबई : येथील ‘मिरॅकल फाउंडेशन इंडिया’ या स्वयंसेवी संस्थेने बालगृहात राहणाऱ्या अनाथ आणि कोवळ्या मुलांना त्यांच्या निरोगी संगोपनासाठी आवश्यक असे पोषक आणि रुचकर अन्न मिळवून देणाऱ्या एका उपक्रमाची घोषणा केली आहे. मुलांना पुरेसे आणि चांगल्या गुणवत्तेचे अन्न मिळावे आणि त्यांची वाढ व विकास निरंतर आणि वेगाने व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबवत असल्याचे संस्थेने म्हटले आहे.

या उपक्रमांतर्गत मदत देणाऱ्या दात्यांना त्यांचा टॅक्स रिटर्न भरताना ‘इन्कम टॅक्स अॅक्ट’च्या ‘८०जी’ सेक्शन अंतर्गत कर सवलतीचा लाभ मिळू शकेल. या पोषण योजनेद्वारे ‘मिरॅकल फाऊंडेशन इंडिया’ सर्व मुलांना दररोज पुरेशा प्रमाणात चार वेळा संतुलित आहार देणार आहे, ज्यात हिरव्या पालेभाज्या, फळे, प्रोटिन आणि दूध तसेच संध्याकाळची न्याहारी असेल. मुलांची देखभाल करताना प्रत्येक मूल निरोगी, सुशिक्षित आणि सक्षम होईल. याकडेही लक्ष दिले जात असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे. 

मिरॅकल फाऊंडेशनच्या भारताच्या प्रमुख निवेदिता दास गुप्ता याबाबत अधिक माहिती देताना म्हणाल्या, ‘दर वर्षी आमच्या निधी उभारणी उपक्रमाच्या माध्यमातून मिरॅकल फाऊंडेशन इंडिया दात्यांना आमच्या उपक्रमांत सहकार्य करून प्रत्येक मुलाला कुटुंब मिळवून देण्यासाठी हातभार लावण्याची कळकळीची विनंती करते. बालगृहातून मुलांची रवानगी एका कुटुंबात करताना आम्ही ही दक्षता घेतो, की त्यांना जगण्यासाठी आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक तो पोषक आहार मिळेल.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna Gramopadhyex About 3 Days ago
Why only in Mumbai?
0
0

Select Language
Share Link