Next
‘स्वरनिनाद’तर्फे रंगणार ‘गंगाधर स्वरोत्सव’
प्रेस रिलीज
Wednesday, February 28, 2018 | 03:27 PM
15 0 0
Share this article:

राहुल देशपांडेपुणे : स्वरनिनाद संस्थेतर्फे येत्या तीन व चार मार्च २०१८ रोजी ‘गंगाधर स्वरोत्सव’ रंगणार आहे. राहुल देशपांडे, अमोल निसळ यांचे गायन, पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचे व्हायोलिन आणि पंडित योगेश समसी यांचे तबलावादन ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. सहकारनगर येथील सातव सभागृहात होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असणार आहे.

स्वरनिनाद ही संस्था भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन आणि प्रसारासाठी कार्यरत असून, पंडित गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी ‘गंगाधर स्वरोत्सवा’चे आयोजन केले जाते.

अमोल निसळतीन मार्चला राहुल देशपांडे यांची शास्त्रीय गायन आणि पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचे व्हायोलिनवादन ऐकायला मिळणार आहे. चार मार्चला अमोल निसळ यांचे गायन आणि योगेश समसी यांचे तबलावादन होणार आहे. त्यांना नीलेश रणदिवे (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), प्रशांत पांडव (तबला), राहुल गोळे (हार्मोनियम) साथ करतील. अॅना कन्स्ट्रक्टर्स, पीआरएम इन्फ्रास्ट्रक्चर्स, यशप्रभा आणि ग्लोबलनेस्ट या संस्थांचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले आहे.

पंडित अतुलकुमार उपाध्येशास्त्रीय संगीताची रुची असणार्‍या युवा गायकांना प्रोत्साहन देण्यासह त्यांच्यातील कलेला चालना देण्यासाठी ‘संगीत, साधना व संस्कार’ या तत्त्वावर स्वरनिनाद काम करत आहे. सध्या ‘स्वरनिनाद’मध्ये २५पेक्षा अधिक विद्यार्थी भारतीय संगीताचे शिक्षण घेत आहेत. रसिकांना चांगले संगीत ऐकायला मिळावे, यासाठी स्वरनिनाद संस्थेचा नियमित प्रयत्न असतो. त्याअंतर्गत त्रैमासिक संगीत सभा घेतली जाते. त्यातून ज्यांना व्यासपीठाची गरज आहे अशा गुणी नवोदित कलाकारांना वाव दिला जातो.

पंडित योगेश समसी‘व्होकल आणि इन्स्ट्रुमेंटल, तबला सोलो आदी प्रकारांचा यामध्ये समावेश असतो. आतापर्यंत पुण्यातील अनेक नवोदित कलाकारांनी, तबला वादकांनी आपली कला सादर केली आहे,’ अशी माहिती स्वरनिनाद संस्थेच्या संचालिका वृषाली निसळ यांनी दिली.

स्वरोत्सवाविषयी :
दिवस : तीन व चार मार्च २०१८
वेळ : सायंकाळी सहा ते ८.३०
स्थळ : सातव सभागृह, सहकारनगर, पुणे
अधिक माहितीसाठी : वृषाली निसळ (९०९६० ८३७८५)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search