Next
सायकल रॅलीला चांगला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Monday, September 10, 2018 | 01:04 PM
15 0 0
Share this article:



पुणे : माय अर्थ फाउंडेशन, सिंहगड युवा फाउंडेशन आणि शिवोदय मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश देण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. नऊ सप्टेंबरला आयोजित केलेल्या या रॅलीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

रविवारी सकाळी या रॅलीला मित्रमंडळ पर्यावरण शिल्प येथून प्रारंभ झाला. श्री गणेश वेशात पर्यावरण संदेश देणाऱ्या युवकाने रॅलीचे नेतृत्व केले. प्लास्टिक व थर्माकॉलमुक्त गणेशोत्सव, पर्यावरण रक्षण, नदी-ओढे-नाले संरक्षण, निर्माल्यमुक्त, प्रदूषणमुक्त असा गणेशोत्सव साजरा करू असे संदेश रॅलीमध्ये देण्यात आले. पर्यावरणप्रेमी नागरिक नितीन कदम यांच्या हस्ते रॅलीला प्रारंभ झाला. माय अर्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अनंत घरत, दिनेश भिलारे, मनीष जगदाळे तसेच सुमारे शंभर युवक या सायकल रॅलीत सहभागी झाले होते.
    
मित्र मंडळ चौकातील पर्यावरण शिल्प येथून रॅलीस प्रारंभ होऊन पुढे सारसबाग, विजयानगर, अल्का टॉकीज मार्गे शनिवारवाड्यास फेरी मारून कसबा गणपती येथे सांगता झाली. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search