Next
विश्वास नांगरे-पाटील यांनी वधू-वरांना दिले हेल्मेट भेट
BOI
Saturday, June 08, 2019 | 10:53 AM
15 0 0
Share this article:

लग्न समारंभात नव दाम्पत्याला हेल्मेट भेट देताना नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील. शेजारी नगरसेवक शैलेश ढगे, आमदार अनिल कदम, काँग्रेसचे राजाराम पानगव्हाणे आणि मान्यवर

नाशिक : लग्न समारंभात नवदांपत्याला विविध प्रकारच्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात; मात्र नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी एका नवविवाहित जोडप्याला हेल्मेट भेट देत हेल्मेट वापराविषयी अनोखी जनजागृती केली.

वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांचे चिरंजीव राकेश व अशोक रामचंद्र मोराडे यांची कन्या योगिता यांचा विवाह नुकताच झाला. नव दाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी नातेवाईकांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पोलीस खात्यातील मान्यवरांनी विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली होती. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनीही विवाहस्थळी जाऊन नवदांपत्यांना आशीर्वाद देत दोघांनाही हेल्मेट भेट दिले. ही अनोखी भेट पाहून सर्वजण अचंबित झाले.

दुचाकीवरून रस्त्याने जाताना हेल्मेट गरजेचे आहे. त्यासाठी सर्वत्र पोलीस हेल्मेट वापरण्याबाबत प्रबोधन करतात आणि जे हेल्मेट वापरत नाही त्यांच्यावर कठोर कारवाई करतात. त्यामुळे गाडी चालवताना हेल्मेट गरजेच असल्याचा संदेश पोलीस आयुक्तांनी या वेळी दिला. 

या प्रसंगी नाशिकच्या महापौर रंजना भानसी, आमदार अनिल कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे पाटील, माजी नगरसेवक शैलेश ढगे आदींसह मान्यवर उपस्थित होते. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search