Next
‘भूमिकांमधलं वैविध्य दाखवायचं आहे’
‘बेफिकरे’ फेम वाणी कपूरला करायचे आहे भरपूर काम
BOI
Wednesday, February 13, 2019 | 05:17 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘बेफिकरे’ आणि ‘शुद्ध देसी रोमान्स’ या दोन वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांमधून समोर आलेली अभिनेत्री वाणी कपूर हिला तिच्या भूमिकांमधील वैविध्य दाखवण्यासाठी आणखी भरपूर काम करायचे असल्याचे तिने म्हटले आहे. आगामी चित्रपटांबाबत बोलताना तिने मोकळेपणाने आपली मते व्यक्त केली.

वाणीला स्वतःला स्क्रीनवर कोणत्या भूमिकेत पाहायला आवडेल असे विचारले असता, आपल्याला अनेक प्रकारच्या भूमिका करायच्या आहेत, ज्यातून अभिनय सादर करण्याची संधी मिळेल आणि लोक आपल्याला वेगवेगळ्या भूमिकेत पाहू शकतील, असे वाणीने म्हटले आहे. तिचे आगामी चित्रपट ‘समशेर’ आणि यशराज बॅनरचा चित्रपट याबाबत बोलताना वाणी म्हणाली, ‘आगामी दोन्हीही चित्रपट पूर्णपणे वेगळे आहेत. यशराज फिल्म्सच्या आगामी चित्रपटात मी ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्यासोबत स्क्रीन शेअर करत आहे. तो ही एक वेगळा अनुभव असेल...’

यासोबतच करिअरबद्दलच्या प्लॅनबाबत वाणीला विचारले असता, ‘मला एक अभिनेत्री म्हणून अजून भरपूर काळ स्क्रीनवर घालवायचा आहे. त्यासाठी चांगल्या, कसदार आणि माझे कसब दाखवू शकेन अशा भूमिकांच्या संधीच्या शोधात मी आहे,’ असे तिने सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search