Next
सिद्धांत खोपडेसह पुण्याच्या शाळकरी खेळाडूंची आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक
BOI
Wednesday, August 01, 2018 | 04:30 PM
15 0 0
Share this article:

पुणे : गेन्क (बेल्जियम) येथे पार पडलेल्या ७०व्या ‘फिसेक - फायसेप गेम्स २०१८’मध्ये ‘स्कूल स्पोर्टस् फेडरेशन ऑफ इंडिया’चा जलतरणपटू सिद्धांत खोपडे याने उत्कृष्ट कामगिरी करून, दोन सुवर्ण, एक रौप्य, आणि एक कांस्यपदक पटकावले. ‘स्कूल स्पोर्टस् फेडरेशन ऑफ इंडिया’चे सचिव विठ्ठल शिरगावकर यांनी ही माहिती दिली.

यामध्ये सिद्धांत खोपडे याने ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण, शंभर मीटर बटरफ्लाय प्रकारात सुवर्ण आणि दोनशे मीटर बटरफ्लाय प्रकारात रौप्य पदक, तर शंभर मीटर बॅकस्ट्रोकमध्ये कांस्यपदक पटकावले. तसेच ‘स्कूल स्पोर्टस् फेडरेशन ऑफ इंडिया’च्या फुटबॉल संघातील मुलांनी, व्हॉलीबॉलच्या मुलींच्या संघाने आणि जलतरणपटू मुलांच्या संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये पुण्याच्या व्हॉलीबॉल चँपियन मिलेनियम स्कूलच्या खेळाडूंचा सहभाग असलेल्या संघाने बाद फेरीत स्पेनचा पराभव करून सहावे स्थान प्राप्त केले, तर मुलांच्या फुटबॉल संघाला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेमध्ये एकूण १८ देशांचा सहभाग होता. या स्पर्धेचे आयोजन ‘फ्लेमिश स्कूल स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने ‘फेडरेशन दी इंटरनॅशनल कॅथलिक स्कूल स्पोर्टस्’च्या (फिसेक) आधिपत्याखाली करण्यात आले होते. ‘फिसेक’ ही इंटरनॅशनल ऑलिंपिक समिती अंतर्गत मान्यताप्राप्त संघटना आहे.

विठ्ठल शिरगावकर म्हणाले, ‘फिसेक गेम्स शालेय खेळाडूंसाठी ऑलिंपिक खेळाच्या तयारीसाठी उत्तम व्यासपीठ असून, येथे आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळते. याचा उपयोग विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धेच्या दृष्टीने होणार आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search