Next
‘लक्ष्मी विलास बँके’तर्फे दोन प्रीपेड कार्ड दाखल
प्रेस रिलीज
Thursday, July 26 | 03:16 PM
15 0 0
Share this story

चेन्नई : लक्ष्मी विलास बँक (एलव्हीबी) या भारतातील एका झपाट्याने प्रगती करणाऱ्या बँकेने देशातील कॅशलेस अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या हेतूने डिजिटल क्षेत्रातील आपल्या वाटचालीमध्ये ‘व्हॅल्यू’ (प्रीपेड) आणि ‘डिलाइट’ (प्रीपेड गिफ्ट) कार्ड दाखल केली आहेत.

व्हॅल्यू कार्ड हे रीलोडेबल कार्ड असून, ते एटीएम, पीओएस व ई-कॉमर्स वेबसाइटवर वापरता येऊ शकते. मूलभूत केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यावर ग्राहकांना सर्व एलव्हीबी एटीएममध्ये मोफत पैसे काढणे, यासह विविध बँकिंग व्यवहार करता येऊ शकतात. हे कार्ड सुरक्षित व सोयीच्या पद्धतीने व्यवहार, सुलभ रीलोडिंग व सर्व मर्चंट आउटलेटमध्ये वैधता असे अन्यही काही फायदे देते.

डिलाइट कार्ड हे वन-टाइम लोडेड गिफ्ट कार्ड असून, त्यातील रक्कम ग्राहक निश्चित करतात. हे कार्ड पीओएस व ई-कॉमर्स वेबसाइटवर वापरता येऊ शकते. ग्राहकांना सर्व एलव्हीबी एटीएममध्ये अर्थव्यतिरिक्तचे व्यवहारही मोफत करता येऊ शकतात. लग्न, वाढदिवस अशा समारंभांसाठी रोख रक्कम देण्याऐवजी डिलाइट गिफ्ट कार्ड देता येऊ शकते.

लक्ष्मी विलास बँकेचे रिटेल बँकिंग प्रमुख पियुष जैन म्हणाले, ‘डिजिटल व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना उत्तेजन देण्यासाठी व्हॅल्यू व डिलाइट कार्ड दाखल करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. या दोन्ही कार्डांमुळे आमच्या ग्राहकांना सर्व पर्यायांद्वारे सोयीच्या व सुरळीत पद्धतीने व्यवहार करणे शक्य होणार आहे. गेल्या काही वर्षांत, डिजिटल परिवर्तन साधण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि कॅशलेस बँकिंग करण्यास चालना देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने आणखी काही उत्पादने व सेवा दाखल करणार आहोत.’

लक्ष्मी विलास बँकेने विविध डिजिटल बँकिंग उत्पादने दाखल करून अगोदरच डिजिटल क्षेत्रामध्ये प्रवेश केला आहे. बँकेने या क्षेत्रात रोबो वेल्थ अॅडव्हॉयजरी प्लॅटफॉर्म, मोबाइल बँकिंग यांसारख्या विविध डिजिटल वैशिष्ट्ये व सेवा सुरू केल्या आहेत. बँक यापुढे या क्षेत्राच्या व ग्राहकांच्या गरजांनुसा विविध उत्पादने व सेवा दाखल करणार आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link