Next
‘अ‍ॅमेझॉन डॉट इन’तर्फे समर सेलची घोषणा
प्रेस रिलीज
Saturday, April 27, 2019 | 03:35 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘अ‍ॅमेझॉन डॉट इन’तर्फे समर सेलची घोषणा करण्यात आली असून चार ते सात मे २०१९ या दरम्यान सेल सुरू राहणार आहे. प्राइम सदस्यांना तीन मेच्या दुपारी १२ वाजल्यापासून अर्ली अॅक्सेस देण्यात येणार आहे. स्मार्टफोन्स, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, मोठी उपकरणे, टीव्ही, स्पोर्ट्स आणि फिटनेस आदी श्रेणीत ग्राहकांना अनेक ऑफर्स देण्यात येणार असून, या सेलअंतर्गत १७० दशलक्ष उत्पादनांचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे.

या विषयी माहिती देताना ‘अॅमेझॉन इंडिया’चे श्रेणी व्यवस्थापन विभागाचे उपाध्यक्ष मनीष तिवारी म्हणाले, ‘सर्वांत विश्वसनीय आणि प्रसिद्ध ई-वाणिज्य व्यासपीठ म्हणून सर्वच प्रसंगी ग्राहकांना उत्तम उत्पादने पुरवण्याचा आमचा निर्धार आहे. ग्राहक या उन्हाळ्यात ज्या उत्पादनांची स्वप्ने पाहतात, त्या सेवा व उत्पादने अॅमेझॉन समर सेल अंतर्गत आम्ही पुरवणार आहोत. उत्कृष्ट डील्स, त्वरित सवलत, नो कॉस्ट ईएमआय आणि सोयीस्कर एक्सचेंज पर्याय यातून ग्राहकांना यंदाचा उन्हाळा ‘अ‍ॅमेझॉन डॉट इन’सह आनंदात घालवता येणार आहे.’

अॅमेझॉन समर सेलदरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वनप्लस, अॅप्पल, सॅमसंग, रिअलमी, ओप्पो, शाओमी, लीवाइज, अॅरो, हूश पप्पीज, सिम्बॉल, यूसीबी, पुमा, व्हेरो मॉडा, फॉसिल, यूएस पोलो, बिइंग ह्यूमन, जॅक अॅंड जोन्स, व्रॅंगलर, बीबा, ऑरेलिया, जेबीएल, बोस, सोनी, एलजी, बीपीएल, बॉश, व्हर्लपूल, वोल्टास, निव्हिया आदी ब्रॅंड्सची खरेदी करू शकतात. अॅमेझॉन इको डिव्हाइसेस, फायर टीव्ही स्टीक्स, किंडल ईरिडर्स आदी उत्पादनांवर अतिरिक्त सवलत देण्यात येणार आहे.

समर सेलदरम्यान खरेदी करणाऱ्या ग्राहकांना एसबीआय डेबिट व क्रेडिट कार्डांवर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. १० कोटींहून अधिक उत्पादनांची खरेदी ग्राहक करू शकणार आहेत. बजाज फिनसर्व्ह ईएमआय कार्ड आणि ठराविक डेबिट व क्रेडिट कार्डांवर नो-कॉस्ट ईएमआय देण्यात येणार आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search