Next
पर्यावरण विवेक समितीचा वृक्षारोपण कार्यक्रम
प्रेस रिलीज
Friday, June 30, 2017 | 01:02 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटोपालघर : विवेक रूरल डेव्हलपमेंट सेंटर संचलित पर्यावरण विवेक समितीच्या वतीने भालीवली प्रकल्पालगत वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी केलेल्या यशस्वी उपक्रमानंतर पुन्हा या वर्षीही महाराष्ट्र सरकारच्या चार कोटी वृक्षलागवडीच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

यासाठी ‘एफडीसीएम’कडून वृक्षारोपणाकरिता परवानगी व जागेची निश्चिती करण्यात आली आहे. संस्थेच्या वतीने या वर्षीही ५०० भारतीय झाडांची लागवड व संवर्धन करण्याचा मानस आहे. त्यातील ५०० झाडे संस्थेच्या बाजूला (महामार्ग क्रमांक आठवर खानिवडे टोल नाक्यापासून एक किलोमीटर अगोदर, विरार फाट्यापासून चार  किलोमीटर मनोरच्या दिशेने पुढे) वन विभागाच्या जमिनीवर लावण्यात येतील व १०० झाडे ‘विवेक’ संचलित राष्ट्र सेवा समितीच्या शाळेतील विद्यार्थांच्या घरी व ५० झाडे विवेक राष्ट्र सेवा समितीच्या हँडीक्राफ्टचे प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांच्या घरी लावण्यासाठी देण्यात येणार आहेत. 

समितीतर्फे वृक्षसंवर्धन दत्तक योजना राबवली जाते. इच्छुक वृक्षप्रेमी झाडे दत्तक घेऊन या योजनेत सहभागी होऊ शकतात, असे कार्यवाह उमेश गुप्ता यांनी सांगितले आहे. 
या अंतर्गत वृक्ष दत्तक घेणाऱ्या पालकाचे नाव तीन वर्षांकरिता झाडावरच टॅग केले जाते आणि समितीच्या वेबसाइटवरही अपलोड केले जाते.

कार्यक्रमाविषयी...
दिवस : शनिवार, एक जुलै २०१७ 
स्थळ : राष्ट्र सेवा समिती, ग्रामविकास केंद्र, भालीवली नाक्याच्या पुढे, एनएच आठ, पालघर.

अधिक माहितीकरिता संपर्क  :
कार्यवाह उमेश गुप्ता : ९३२२६ ९२७४३, ९४२२४ ९२७४३ 
मार्गदर्शक : एन. ए. पाटील (निवृत्त वनाधिकारी एसीएफ) : ९९६०३ ९७६०२ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search