Next
‘पुणे सेव्हन एसेस’च्या जर्सीचे अनावरण
प्रेस रिलीज
Friday, December 21, 2018 | 02:10 PM
15 0 0
Share this article:मुंबई : कुर्ला येथील फोनिक्स मार्केट सिटीत झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात ‘पुणे सेव्हन एसेस’ या प्रीमियर बॅडमिंटन लीग (पीबीएल) फ्रँचाइझीने बॉलिवूड स्टार आणि या संघाची सहमालक अभिनेत्री तापसी पन्नूच्या उपस्थितीत नव्या संघाच्या जर्सीचे अनावरण केले.

ऑलिंपिक सुवर्णपदक विजेती आणि तीनदा विश्वविजेती झालेली या टीमची आयकॉन खेळाडू कॅरोलिना मरिन संपूर्ण संघासोबत ‘पुणे सेव्हन एसेस’च्या रंगामध्ये उभी राहिली होती. सध्या हा संघ २२ डिसेंबर २०१८ रोजी वरळीमधील एनएससीआय येथे हैद्राबाद हंटर्स विरोधात होत असलेल्या मोठ्या सामन्याची तयारी करत आहे. विशेष म्हणजे, रियो ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पीव्ही सिंधू हैद्राबाद हंटर्सची आयकॉन खेळाडू आहे.

लंडन ऑलिंपिंक्स डबल्स स्पेशॅलिल्ट मॅथिएस बो ही ‘पुणे सेव्हन एसेस’चे आणखी एक आकर्षण असून, ती तरुण आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघाचे नेतृत्व करेल. संघाच्या इतर सदस्यांमध्ये चिराग शेट्टी, व्ह्लादीमिर इव्हानॉव्ह, लाइन, लक्ष्य सेन, ब्राइस लेव्हेर्डेझ, हर्शील दानी, अजय जयराम आणि प्राजक्ता सावंत यांचा समावेश आहे.

या प्रसंगी ‘पुणे सेव्हन एसेस’ची सहमालक तापसी म्हणाली, ‘नव्या जर्सीचे अनावरण करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. बॅडमिंटनचे जन्मस्थान असलेल्या पुणे शहराकडून या जर्सीची प्रेरणा घेण्यात आली आहे. याचे रंग ठळक आणि उठावदार असून, ते संघाच्या वृत्तीचे प्रतिबिंब दर्शवतात. आम्ही पारंपरिक नाही, आम्ही तुल्यबळ संघ आहोत. जर्सीचे रूप पाहून मी खूष आहे आणि ती परिधान करून खेळणारा संघ पाहाण्यासाठी मी उत्सुक आहे.’कॅरोलिना मरिन म्हणाली, ‘पुणे सेव्हन एसेसमध्ये ‘पीबीएल’साठी समाविष्ट होताना मला आनंद झाला आहे. गेले काही दिवस मी मसाला डोसा आणि इतर भारतीय खाद्यपदार्थांवर मनापासून ताव मारत आहे. भारतात कायमच खूप चांगला अनुभव मिळाला असून, येथे परत आल्याचा मला आनंद होत आहे. पीव्ही सिंधूविरोधात पहिला सामना खेळण्यासाठी मी उत्सुक आहे.’

मॅथिएस बो म्हणाली, ‘हा हंगाम उत्सुकतापूर्ण असेल आणि मी त्याच्या प्रतीक्षेत आहे. आमचा संघ तरुण रक्त आणि अनुभव यांचा समतोल साधणारा असून, मला खात्री आहे, की तो विजेतेपदाचा तुल्यबळ दावेदार असेल.’

‘पुणे सेव्हन एसेस’चा संघ : मॅथिएस बो (कर्णधार), कॅरोलिना मरिन (आयकॉन), चिराग शेट्टी, व्ह्लादीमिर इव्हानॉव्ह, लाइन, लक्ष्य सेन, ब्राइस लेव्हेर्डेझ, हर्शील दानी, अजय जयराम आणि प्राजक्ता सावंत
 
‘पुणे सेव्हन एसेस’चे सामने याप्रमाणे असतील :
२२ डिसेंबर २०१८–
पुणे सेव्हन एसेस वि. हैद्राबाद हंटर्स (एनएससीआय, मुंबई)
२४ डिसेंबर- पुणे सेव्हन एसेस वि. अवध वॉरियर्स (एनएससीआय, मुंबई)
२९ डिसेंबर- पुणे सेव्हन एसेस वि. मुंबई रॉकेट्स (बालेवाडी स्टेडियम, पुणे)
३० डिसेंबर- पुणे सेव्हन एसेस वि. बेंगळुरू रॅप्टर्स (बालेवाडी स्टेडियम, पुणे)
तीन जानेवारी २०१९- पुणे सेव्हन एसेस वि. चेन्नई स्मॅशर्स (ट्रान्सस्टेडिया, अहमदाबाद)
सहा जानेवारी- पुणे सेव्हन एसेस वि. दिल्ली डॅशर्स (ट्रान्सस्टेडिया, अहमदाबाद)
११ जानेवारी– उपांत्य फेरी (टीबीडी) (कांतीरावा इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू)
१३ जानेवारी– अंतिम फेरी (कांतीरावा इनडोअर स्टेडियम, बेंगळुरू).
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search