Next
रत्नागिरीतील मॅरेथॉनला चांगला प्रतिसाद
BOI
Monday, November 19, 2018 | 11:06 AM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
आयएमए अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशन आणि वीरश्री चॅरिटेबल ट्रस्ट यांनी रविवारी, १८ नोव्हेंबर २०१८ रोजी रत्नागिरीत आयोजित केलेल्या मिनी मॅरेथॉन आणि मॅरेथॉन स्पर्धांना रत्नागिरीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. सहा वर्षांपासून ५० वर्षापर्यंत वयाच्या अनेक नागरिकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला.

थिबा पॅलेस येथील आकाशवाणी केंद्राजवळ जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या मॅरेथॉन आणि मिनी मॅरेथॉनला झेंडा दाखवल्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. प्रथम ‘ड्रीम मॅरेथॉन’ला सुरुवात झाली. मारुती मंदिरमार्गे टीआरपी आणि परत मारुती मंदिरला येऊन या मॅरेथॉनची सांगता झाली. सहा ते १५ वर्षे वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या मिनी मॅरेथॉनची सांगता मारुती मंदिर येथे झाली. 

मिनी मॅरेथॉनमध्ये तीन गट करण्यात आले होते. त्या प्रत्येक गटातील मुलगे आणि मुलींचे प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले. सहा ते नऊ वर्षे वयोगटामध्ये मुलांमध्ये अमन मंत्रा, सार्थक कार्लेकर आणि अरमान मंत्रा, तर मुलींमध्ये स्वरांजली कार्लेकर, सिमरीला जैन आणि शमिका खानविलकर यांचे पहिले तीन क्रमांक आले.१० ते १३ वयोगटात मुलांमध्ये सार्थ पांगारकर, पीयूष गिम्हवणेकर आणि रोहित रेड्डी, तर मुलींमध्ये रिया पाडळकर, त्रिशा मयेकर आणि गायत्री शिवलकर यांचे अनुक्रमे पहिले तीन क्रमांक आले. १४ ते १६ वयोगटात मुलांच्या गटात राज शिवलकर, आदिश नानवडे आणि आदित्य केळकर यांनी, तर मुलींमध्ये कशीश शेट्ये, अनुजा माळी आणि इशिता गांधी यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.

या वेळी वीरश्री चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष बालरोगतज्ज्ञ डॉ. नीलेश शिंदे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे रत्नागिरीचे अध्यक्ष डॉ. पराग पाथरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. बामणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, डॉ. तोरल शिंदे, डॉ. शेरखाने, डॉ. सोनाली पाथरे, डॉ. नाफडे, डॉ निशिगंधा पोंक्षे या मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.(वीरश्री चॅरिटेबल ट्रस्टने रत्नागिरीत आयोजित केलेल्या पहिल्या सायकल रॅलीसंदर्भातील वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search