Next
पुणे शासकीय तंत्रनिकेतनचे स्नेहसंमेलन उत्साहात
BOI
Saturday, December 29, 2018 | 04:59 PM
15 0 0
Share this article:

पुणे : गेल्या ६१ वर्षांपासून कार्यरत असलेल्या आणि ४० हजारांहून अधिक विद्यार्थी घडवणाऱ्या येथील शासकीय तंत्र निकेतन या संस्थेतील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी माजी विद्यार्थी आणि आयएएस ऑफिसर प्रवीण दराडे व कमिन्स कंपनीचे व्हाइस प्रेसिडेंट मंदार देव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या वेळी मनोगत व्यक्त करताना दराडे म्हणाले, ‘१९८७ साली ‘जीपीपी’मधून उत्तीर्ण झालो. पुढे आयएएस ऑफिसर  झालो. सध्या मुख्यमंत्री सचिव व महाराष्ट्रातील विविध ठिकाणच्या मेट्रो प्रकल्पाचा प्रमुख म्हणून कार्य करताना मला ‘जीपीपी’मध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगमधील शिक्षणाचा चांगलाच फायदा होतो. कोणतेही शिक्षण कधीच वाया जात नाही. आज मी जो काही आहे तो माझ्या गुरुवर्य मंडळींमुळेच आहे.’

‘जीपीपी’ हे अत्यल्प फीमध्ये शिक्षण पुरवत असल्यामुळे माझ्यासारख्या गरीब घरातील मुलाला येथे शिकता आल्याचे देव यांनी सांगितले.

संस्थेचे अध्यक्ष यशराज पारखी म्हणाले, ‘ही संस्था १९५७ साली सुरू झाली. आजवर संस्थेच्या माध्यमातून २५ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेऊन जगाच्या काना-कोपऱ्यात विविध कंपनीमध्ये महत्त्वाच्या पदांवर आहेत, तर हनुमंतराव गायकवाडसारख्या उद्योगमहर्षी ने ७० हजारांहून अधिक लोकांना रोजगार प्राप्त करून दिला आहे. आज ‘जीपीपी’ला सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याची गरज आहे.’

या वेळी प्राचार्य डॉ. दिलीप नंदनवार, स्टाप समन्वयक प्रा. मीरा चिगटेरी, प्रा. आनंद झानपुरे, कार्यक्रम समन्वयक अनिरुद्ध गढीकर, डिपार्टमेंट प्राध्यापक समन्वयक प्रा. गोंदाने, प्रा. नेहा सरवदे, प्रा. नमिता कदम, प्रा. सारिका आगलावे, प्रा. सायली अम्बावने, प्रा. सीमा कोल्हे, प्रा. जाधव उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन जीपीपीयन माजी विद्यार्थी संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. हेमंत मते यांनी प्रस्ताविक केले. प्रा. चिगटेरी यांनी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन एकमेकांना नोकरी, व्यवसाय वाढीसाठी सहकार्य करण्याचे, तसेच स्वतःचे अनुभव आजी विद्यार्थ्यांना सांगण्याचे आवाहन केले. विनोद ताम्हाणे व प्रा. शलाका जोशी यांनी सूत्रसंचालन केले. महेश गायकवाड यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search