Next
‘रोटरी क्लब’तर्फे विद्यार्थ्यांना जीवनोपयोगी साहित्याचे वितरण
प्रेस रिलीज
Tuesday, December 11, 2018 | 03:11 PM
15 0 0
Share this article:

पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन यांच्यातर्फे एक हजार ग्रामीण विद्यार्थ्यांना एकूण ५० लाख रुपये किंमतीचे जीवनोपयोगी आणि शिक्षणोपयोगी साहित्याचे वितरण आठ डिसेंबर २०१८ रोजी करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन, रोटरी क्लब ऑफ पुणे कॅन्टोन्मेंट, कॅनडातील ‘स्कॉ’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. जीवनोपयोगी साहित्याच्या संचात कपडे, शैक्षणिक साहित्य, झोपण्याचे साहित्य (स्लीपिंग किट), दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचा समावेश होता.

या कार्यक्रमादरम्यान देसाई रुग्णालयातर्फे विद्यार्थ्यांची मोफत नेत्रतपासणी करण्यात आली. रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवनचे माजी अध्यक्ष आणि या प्रकल्पाचे समन्वयक शैलेश गांधी, पंकज आपटे, अमृता देवगावकर, बिनायक चौधरी, समीर रूपाणी, ‘स्कॉ’ संस्थेचे ख्रीस हिल्स, सरपंच जयश्री नेहरे या वेळी उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन १९७० सालापासून या उपक्रमाला सुरुवात झाली. या उपक्रमाला कॅनडातील सामाजिक संस्थेची मदत मिळत आहे.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search