Next
‘यशासाठी गुणवत्तेला मेहनत, कल्पकता यांची जोड हवी’
BOI
Saturday, April 01, 2017 | 04:37 PM
15 9 0
Share this article:

शिरपूर (धुळे) : ‘केपीआयटी स्पार्कल २०१७’ या नावीन्यपूर्ण संकल्पना सादरीकरणाच्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत शिरपूरच्या आर. सी. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. या विद्यार्थ्यांनी ‘इन्स्पेक्शन रोबोट फॉर ट्रान्समिशन लाइन्स’ या संकल्पनेचे ‘वर्किंग प्रोटोटाइप’ स्पर्धेत मांडले होते. त्या प्रकल्पाला  केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सुवर्णचषक, प्रमाणपत्र आणि रोख पाच लाख रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. केपीआयटी कंपनीने सर्व पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांची ट्रेनी इंजिनीअरपदी निवड केली आहे. ही स्पर्धा नुकतीच पुण्यात पार पडली होती.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, संस्थाध्यक्ष आमदार अमरीश पटेल व संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांची भेट घेतली. ‘गुणवत्तेला मेहनतीची व कल्पकतेची जोड दिली, की अद्वितीय व उल्लेखनीय यश हमखास मिळते आणि आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे यश मिळवून सिद्ध केले आहे,’ असे गौरवोद्गार अमरीश पटेल यांनी काढले.
ते म्हणाले, ‘ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्ञानाने व गुणवत्तेने कुठेही कमी नाहीत, आवश्यकता आहे ती फक्त योग्य मार्गदर्शनाची आणि प्रोत्साहनाची. शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या सर्वच शाखांमधून हे कार्य निष्ठेने व दर्जेदाररीत्या होत असल्याचे विद्यार्थ्यांच्या यशामुळे दिसून आले आहे.’

दिगंबर पाटील, वैभव नाईक, अतुल पाटील, अक्षय नेवे व अमोल सूर्यवंशी या विद्यार्थ्यांच्या चमूने ‘इन्स्पेक्शन रोबोट फॉर ट्रान्समिशन लाइन्स’ ही संकल्पना मांडली होती. हितेश पाटील, अक्षय कुंवर, योगेश जाधव, अविनाश कोळी, पुरुषोत्तम शिंपी यांनी ‘ई-बायसिकल’ ही संकल्पना स्पर्धेमध्ये मांडली होती. 

पुणे येथे झालेल्या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीसाठी २७ राज्यांतील ३२९ महाविद्यालयांच्या एकूण १५४५ संकल्पनांपैकी फक्त ३५ संकल्पनांची निवड करण्यात आली. यात महाविद्यालयाच्या दोन्ही संकल्पनांची निवड झाली होती. 
या सर्व विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील यांच्यासह संस्थाध्यक्ष आमदार पटेल व संस्थेचे कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल यांची भेट घेऊन या स्पर्धेची व त्यांनी सादर केलेल्या संकल्पनांची प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती दिली.

‘इन्स्पेक्शन रोबोट फॉर ट्रान्समिशन लाइन्स’ या संकल्पनेअंतर्गत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वयंचलित रोबो तयार केला होता. अत्युच्च व उच्च दाबाच्या वीजवाहक तारांची देखभाल करण्याचे जिकिरीचे व धोक्याचे काम खुबीने व सुलभतेने करणे, तसेच धातूने बनलेल्या या तारांना कार्बन पॉलिश करणे, सातत्याने त्यांचे तापमान नियंत्रित ठेवणे, या तारांमधील विद्युतदाब प्रमाणात राखणे, तसेच वहनादरम्यान होणाऱ्या वीजगळतीची नोंद ठेवून ती नियंत्रित करण्याची, तसेच वाहक तारांच्या स्थितीची सूचना देणे आदी कामे रोबोद्वारे केली जातात. त्यामुळे गंभीर अपघात होऊन जीवितहानी होण्याची घटना टाळली जाऊ शकते. 

आमदार पटेल व भूपेशभाई पटेल यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रोबोची, तसेच सायकलची पाहणी करून त्यातील तांत्रिक बारकावे जाणून घेतले. ‘महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना संशोधन करण्यासाठी मार्गदर्शन करावे व प्रोत्साहन द्यावे,’ असे सांगून आमदार पटेल यांनी संस्थेकडून आर्थिक, तांत्रिक व इतर आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले. या भेटीच्या वेळी प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील, उपप्राचार्य डॉ. प्रमोद देवरे आदी उपस्थित होते. 
15 9 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
suryakant dodmise About
RIT Industry Global Meet RIT has conducted an Industry Meet on 26th March 2017 at RIT, Islampur. It was an honor for us to have a privilege who has attended the RIT – INDUSTRY GLOBAL MEET (An Initiative by RAJARAMBAPU INSTITUTE OF TECHNOLOGY). This has enhanced the privilege of our event and has made the event more sophisticated. The aim of this Industry Meet was to establish an Industrial Network within the Maharashtra region and to allow better coordination and cooperation between the Industries and also to increase their domains of action in particular, at the National, Regional and International level. This meeting has a follow up to the recommendations of RIT Director, Dr. Sushma S. Kulkarni & Udyog shree Maruti Pawar, MD, Amptronics Techno Pvt Ltd., Mumbai in strengthened the role of Local Industries especially in Economic Product Commercialization for society through Industry collaboration. More than 200 industrialists participated.
0
0

Select Language
Share Link
 
Search