Next
पुणे येथे ‘जननी’ एकपात्री प्रयोगाला चांगला प्रतिसाद
प्रेस रिलीज
Friday, December 14, 2018 | 03:23 PM
15 0 0
Share this article:

एकपात्री प्रयोग सादर करताना अंजली कऱ्हाडकरपुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाउंडेशन यांच्या वतीने सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत अंजली कऱ्हाडकर यांच्या ‘जननी’ या एकपात्री प्रयोगाचे १२ डिसेंबर २०१८ रोजी आयोजन करण्यात आले होते. विद्या भवनच्या सरदार नातू सभागृहात हा कार्यक्रम झाला. त्याला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

जननी म्हणजे आईची महती साहित्यातील विविध प्रकारांमध्ये वर्णिली आहे. कथा, कादंबऱ्या, कविता, नाटक यांमधील आईची रूपे मांडणारा हा आगळा वेगळा एकपात्री प्रयोग अंजली यांनी सादर केला.

सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा ६३ वा कार्यक्रम होता. अंजली यांनी या कार्यक्रमात साहित्यातील अनेक व्यक्तिरेखा, स्वगते, नाट्यपदे, नाट्यछटा गाऊन साभिनय सादर केल्या. ‘अनंतयुगाची जननी’ या समर्थ रामदासांच्या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‘वीज म्हणाली धरतीला’ हा राणी लक्ष्मीबाईंचा, वि. वा. शिरवाडकर लिखित नाट्यप्रवेश उत्स्फूर्तपणे सादर झाला. बहिणाबाईंच्या ‘आज माहेराला जाणे’ या कवितेतून सासुरवाशिणीचे भावविश्व उलगडले. नाट्य छटाकार दिवाकर यांची ‘चिंगी महिन्याची’ ही नाट्यछटा त्यांनी सादर केली. सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे म्हणून आताची आधुनिक माता कशाप्रकारे मुलांना विविध क्लास लावते, स्पर्धेत टिकण्यासाठी त्यावरील नाटिका सादर केली गेली.

मंगेश पाडगांवकर यांची ‘चिऊताई’ ही कविता सादर करण्यात आली. सुधा मूर्ती यांची ‘गौरम्मा’ ही रचना सादर झाली. त्याचप्रमाणे वसंत कानेटकर लिखित ‘हिमालयाची सावली’ आणि ‘अखेरचा सवाल’ हे नाट्य प्रवेश सादर करण्यात आले. बालगंधर्व यांचे ‘नाही मी बोलत नाथा’ हे नाट्यपद अंजली यांनी गाऊन साभिनय सादर केले. कार्यक्रमाची सांगता तुकाराम महाराजांच्या ‘मायेविण बाळ’ या अभंगाने झाली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search