Next
‘मासिक पाळीबद्दल पुरुषांनीही जागृती केली पाहिजे’
महिला दिनानिमित्त अभिनेता मानव गोहिलचे पुरुषांना आवाहन
BOI
Wednesday, March 06, 2019 | 04:53 PM
15 0 0
Share this article:

मानव गोहिलमुंबई : आठ मार्च, महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित दौडमध्ये अभिनेता मानव गोहिल हा सहभागी होणार आहे. यानिमित्ताने तो ‘मासिक पाळी आणि महिलांचे आरोग्य’ या विषयावर जनजागृतीही करणार आहे. हे करत असताना, ‘पुरुषांनीही मासिक पाळीसारख्या सामाजिकरीत्या बोलल्या न जाणाऱ्या विषयावर जनजागृतीपर चर्चा केली पाहिजे’, असे मत त्याने व्यक्त केले आहे.

‘रन फॉर नाइन’ या संस्थेतर्फे या रनचे आयोजन करण्यात आले आहे. अभिनेता अक्षय कुमार याच्या सहभागातून हा रन होणार आहे. मासिक पाळी आणि महिलांचे इतर प्रश्न याबाबत जनजागृती करणार असलेल्या मानवला याबाबत विचारले असता त्याने, ‘आपण पितृप्रधान संस्कृतीत वाढलो आहोत आणि आजही काही प्रमाणात का होईना ती दिसते. असे असताना पुरुष आणि मुले यांच्यावर विशेष जबाबदारी येते, की आपण मासिक पाळी आणि महिलांच्या आरोग्याबाबतही खुलेपणाने चर्चा करून जागृती केली पाहिजे. आज समाजात बहुसंख्य महिला या मासिक पाळीतील अस्वच्छता यामुळे विविध रोगांच्या शिकार होताना दिसतात. हे कमी झाले पाहिजे’, असे मत व्यक्त केले. 

या व्यतिरिक्त मानवने महिला दिनाच्या दिवशी मुंबईत होत असलेल्या या रनमध्ये सहभागी होण्यासाठी पुरुषांना आवाहन केले आहे. याबाबत आणखी माहिती देताना तो म्हणाला, ‘या सगळ्या गोष्टींची, चर्चेची सुरुवात ही घरापासूनच होणे गरजेचे आहे. आई आणि वडील दोघांनीही मासिक पाळीबद्दल आपल्या मुलींशी मोकळेपणाने बोलले पाहिजे. असे झाले, तरच पुढे घरातील मुलेही या गोष्टी मोकळेपणाने बोलतील आणि त्याबद्दल जागरूक होतील. यामुळे बहुतांश मुली मासिक पाळीतील अज्ञानामुळे होणाऱ्या आजारांच्या शिकार होणार नाहीत.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search