Next
सीएम चषक युवा महासंगम तीन फेब्रुवारीला मुंबईत
पन्नास हजार जणांचा सहभाग
प्रेस रिलीज
Wednesday, January 30, 2019 | 06:27 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘राज्यातील ४३ लाख युवांचा सहभाग असलेल्या ‘सीएम चषक’ या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेची राज्यस्तरीय अंतिम स्पर्धा मुंबई, पुणे व अहमदनगर येथे मंगळवारी सुरू झाली. मुंबईत तीन फेब्रुवारी रोजी युवा महासंगम आयोजित करण्यात आला असून, त्यात ५० हजार युवक-युवती सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे, भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्षा खा. पूनम महाजन,  क्रीडामंत्री विनोद तावडे आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा महासंगम होणार आहे,’ अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी बुधवारी, ३० जानेवारी २०१९ रोजी पत्रकार परिषदेत दिली.


भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला प्रवक्ते केशव उपाध्ये, भाजयुमो प्रदेश सरचिटणीस संतोष पाटील दानवे, विक्रांत पाटील, तसेच भाजयुमो मुंबई अध्यक्ष मोहित भारतीय उपस्थित होते.

योगेश टिळेकर म्हणाले, ‘सीएम चषक या स्पर्धेत १२ विविध प्रकारचे खेळ व कला प्रकारात ४३ लाख स्पर्धकांचे आठ लाख सामने झाले. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पंचवीस ते तीस हजार स्पर्धक यात सहभागी झाले होते. यातील क्रिकेट स्पर्धेचे अंतिम सामने २९ ते ३१ जानेवारीपर्यंत अहमदनगरमध्ये, तर कुस्तीच्या अंतिम स्पर्धा ३१ जानेवारी रोजी पुण्यात होणार आहेत.’


मोहित भारतीय म्हणाले, ‘ मुंबईत दोन व तीन फेब्रुवारी रोजी व्हॉलीबॉल, खो – खो, कबड्डी, कॅरम, ॲथलेटिक्स, रांगोळी, चित्रकला, गीत व नृत्य याच्या अंतिम स्पर्धा होतील. मुंबईत होणाऱ्या समारोप समारंभामध्ये राज्याच्या विविध जिल्ह्यांतील ५० हजार युवक-युवती सहभागी होतील.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search