Next
‘पेटीएम’ची ‘सिटीबँके’च्या सहयोगाने क्रेडिट कार्ड सेवा सुरू
प्रेस रिलीज
Saturday, May 18, 2019 | 02:51 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘पेटीएम’ या भारतातील सर्वांत मोठ्या डिजिटल पेमेंट मंचाने ‘सिटीबँके’च्या सहयोगाने क्रेडिट कार्ड सेवेला सुरुवात केली. ‘पेटीएम फर्स्ट कार्ड’ नावाने सुरू केलेले हे भारताचे पहिले अमर्यादित कॅशबॅक क्रेडिट कार्ड असून, प्रत्येक व्यवहारावर ग्राहकांना एक टक्का कॅशबॅक मिळणार आहे. 

‘पेटीएम फर्स्ट कार्ड’साठी ग्राहकांना वार्षिक ५०० रुपये शुल्क भरावे लागणार असून, वर्षाला ५० हजारांहून अधिक खर्च होणार असतील, तर हे शुल्क माफ होणार आहे. या कार्डची मासिक किमान मर्यादा एक लाख रुपये आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकृत या क्रेडिट कार्डसाठी ग्राहक पेटीएम अॅपद्वारे अर्ज करू शकतात. ‘पेटीएम फर्स्ट कार्ड’द्वारे जारी झाल्याच्या पहिल्या चार महिन्यांमध्ये ग्राहकांनी किमान १० हजार रुपयांचा खर्च केल्यास त्यांना १० हजार रुपयांचे पेटीएम प्रोमो-कोड जारी केले जातील.   

‘पेटीएम’ची पालक कंपनी ‘वन९७ कम्युनिकेशन्स’चे अध्यक्ष आणि सीईओ विजय शेखर शर्मा म्हणाले, ‘पेटीएम फर्स्ट कार्डसाठी ‘सिटी’सोबत भागीदारी करण्याचा आम्हाला आनंद होत आहे. नवीन ऑफर्स आमच्या ग्राहकांना त्यांच्या डिजिटल पेमेंट पर्यायांमध्ये संपूर्ण लवचिकता निर्माण करण्यास आणि मोठ्या-तिकिट कॅशलेस पेमेंटला प्रोत्साहित करण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या आहे. आम्हाला आमच्या ग्राहकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास आहे.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search