Next
‘अन्नपूर्णा’ला क्षेत्रीय सहकारी उत्कृष्टता पुरस्कार प्रदान
प्रेस रिलीज
Wednesday, January 16, 2019 | 11:43 AM
15 0 0
Share this story



पुणे : राज्य शासनाच्या सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेच्या निवड समितीतर्फे अन्नपूर्णा महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला महिला श्रेणीतील क्षेत्रीय सहकारी उत्कृष्टता पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले.
 
हा पुरस्कार सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्या वतीने सतीश सोनी यांच्या हस्ते २५ हजार रोख रक्कम आणि प्रमाणपत्र अन्नपूर्णा परिवाराला प्रदान करण्यात आले. ‘अन्नपूर्णा’तर्फे मायक्रो फायनान्स प्रमुख उज्ज्वला वाघोले, फायनान्स मॅनेजर सुजाता भट व वर्षा गायकवाड आणि रेश्मा तांबोळी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

या वेळी बोलताना ‘अन्नपूर्णा’च्या मायक्रो फायनान्स प्रमुख वाघोले यांनी गेल्या २५ वर्षांत ‘अन्नपूर्णा’ने वस्तीतील महिलां-मुलांसाठी कर्ज, बचत, विमा, निवृत्तीवेतन आणि डे केअर सेंटर, महिलांचे सशक्तीकरण यासाठी केलेल्या विविध कार्यांची माहिती दिली. ‘अन्नपूर्णा’ने कर्ज दिलेल्या गरीब महिलांनी नेहमीच कर्जाची परतफेड ही वेळेत केली असल्याचे वाघोले यांनी आवर्जून नमूद केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link