Next
हिमायतनगर पंचायत समितीमध्ये पाणीटंचाईची आढावा बैठक
नागेश शिंदे
Tuesday, November 20, 2018 | 04:45 PM
15 0 0
Share this article:



हिमायतनगर :
शहरातील पंचायत समितीच्या सभागृहात १९ नोव्हेंबर २०१८ रोजी पाणीटंचाई आढावा बैठक पार पडली. हदगाव-हिमायतनगर तालुक्याचे आमदार नागेश पाटील-आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. 

तालुक्यातील कित्येक गावांत बोअरवेलची कामे न झाल्याने पाटील यांनी ग्रामसेवक व प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यापुढे कोणीही कामचुकारपणा करत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. तालुक्यात या वर्षी अनेक गावांत पाणीटंचाई  भासणार असून, उन्हाळ्यापूर्वीच प्रत्येक गावातील नवीन बोअरवेलसह विहिरींचे अधिग्रहण करावे, अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली.

या बैठकीला तहसीलदार बिराजदार, गटशिक्षणाधिकारी सुहास कोरगावे, हिमायतनगरचे नगराध्यक्ष कुणाल राठोड, सुदेश मांजरमकर, सभापती मायाताई राठोड, उपसभापती खोब्राजी वाळके, दिलीप राठोड, शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, उप-तालुकाप्रमुख विलास वानखेडे, सावन डाके, प्रकाश रामदीनवार, युवा सेना तालुकाप्रमुख विशाल राठोड, योगेश चिल्कावार यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक व सर्व खात्यांच्या विभागप्रमुखांसह अधिकारी उपस्थित होते. 
गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे म्हणाले, ‘बोअरवेलला पाणी लागत नसल्याने विहीर पुनर्भरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.’ रस्ते, पांदण दुरुस्तीसाठी शासनाचा निधी आला असून, शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन तहसीलदारांनी केले.



या वर्षी पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे संकेत मिळत असल्याचे अनेक गावांच्या ग्रामपंचायतींतर्फ सांगण्यात आले. उन्हाळ्यापूर्वीच विहिरीतील गाळ काढणे, बोअरवेल अधिग्रहण, नवीन बोअरवेल आदींची मागणी या वेळी करण्यात आली. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटविकास अधिकारी कोरेगावे यांनी केले, तर आभार विस्तार अधिकारी क्षीरसागर यांनी मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search