Next
‘स्त्रियांना पाठबळ मिळाल्यास त्या अशक्य ते शक्य करतात’
डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे गौरवोद्गार
BOI
Friday, March 15, 2019 | 02:13 PM
15 0 0
Share this story

पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सत्कारमूर्तींसह प्रमुख पाहुणे डॉ. विश्वास मेहेंदळे यांच्यासह डॉ. रेणू गाडगीळ, सतीश कुबेर, त्रिवेणी चाळके, स्मिता मुधोळ व मयुरी साळवी.

पुणे : ‘समाजासमोर आपल्या नेतृत्वाची छाप सोडताना अन्य स्त्रियांनाही प्रेरणा मिळेल अशीच कर्तबगारी महिलांकडून केली जात आहे. स्त्रियांना पाठबळ मिळाल्यास अशक्य ते शक्य होते, हे कर्तृत्ववान  महिलांच्या यशातून अधोरेखित होते,’ असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखक डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी व्यक्त केले. पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या विशेष सन्मान सोहळ्यास डॉ. मेहेंदळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

या वेळी शेतकरी कुटुंबातील उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेल्या स्वाती दाभाडे, युवा शास्त्रज्ञ श्वेता कुलकर्णी, भिक्षेकरींसाठी काम करणाऱ्या डॉ. मनीषा सोनवणे, जवानांच्या कुटुंबियांसाठी काम करणाऱ्या ज्योत्स्ना गर्गे, ब्यूटी पॅजंट विनर्स पूजा बिरारी, सिमरन नाईक तसेच, समाजसेवा करणाऱ्या प्रिया बनकर, दीपा पराते, सुनिता शिंदे, स्वाती जोशी, वैशाली परचंड, सायली केरीपाळे, स्वाती रानवडे, सय्यद शर्मिला, ज्योती कानेटकर, नेत्रा पाटकर, अंजना सोनावणे, दुर्गा मिरजकर आणि प्रीती वैद्य यांचा सन्मान करण्यात आला. पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि.च्या संचालिका डॉ. रेणू गाडगीळ, विक्री प्रमुख सतीश कुबेर, स्टोअर इनचार्ज त्रिवेणी चाळके, स्मिता मुधोळ व मयुरी साळवी आदी या वेळी उपस्थित होते. शर्मिला महाजन यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link