Next
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेडला राज्यस्तरीय कार्यक्रम
मुख्यमंत्र्यांसह रामदेव बाबा उपस्थित राहणार
प्रेस रिलीज
Thursday, June 20, 2019 | 01:19 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून २०१९ रोजी नांदेडमध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम होणार असून, या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह योगगुरू रामदेव बाबा उपस्थित राहणार असल्याची माहिती शालेय शिक्षण आणि क्रीडा मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

मंत्रालय विधीमंडळ वार्ताहर संघ येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नांदेड येथे आयोजित कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी माहिती देताना ते बोलत होते. या वेळी रामदेव बाबा उपस्थित होते.

ॲड. शेलार म्हणाले, ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस घोषित केला असून, जगभरातील देश हा दिवस उत्साहाने साजरा करीत आहेत. स्वस्थ महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित नांदेड येथील कार्यक्रमास पतंजली योगपीठाचे सहकार्य मिळणार असून, दीड लाखापेक्षा अधिक लोकांना एकाचवेळी योगासने करता येतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.’


या वर्षी योग दिवस राज्यातील ३६ जिल्हा मुख्यालय आणि ३२२ तालुका मुख्यालय अशा ३५८ ठिकाणी साजरा केला जाणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातील किमान पाच हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याचे ॲड. शेलार यांनी सांगितले.

नियमितपणे योग केल्याने आपला दिवसच नाही, तर आयुष्य चांगले होईल, आजारांपासून आपण दूर राहू, असे रामदेवबाबांनी सांगितले. पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी योग करण्याचे महत्त्व, योग कसा करता येतो, योगमुळे काय फायदे होतात याची प्रात्यक्षिके दाखविली.


दरम्यान, योग दिनानिमित्त नांदेड येथे होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी, तसेच राज्यभरातील आयोजनाबाबत चर्चा करण्यासाठी योगगुरू रामदेवबाबांनी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. राज्यातील या उपक्रमात विविध घटक उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आहेत.  मोदी यांच्या सहभागामुळे आंतरराष्ट्रीयस्तरावरूनही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे नमूद करत रामदेवबाबांनी समाधान व्यक्त केले.

या वेळी आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री अॅड. आशिष शेलार, आमदार राज पुरोहीत आदी उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search