Next
‘डीटीडीसी’ दिल्ली डेअरडेविल्स संघाचा लॉजिस्टिक्स भागीदार
प्रेस रिलीज
Friday, April 06, 2018 | 05:18 PM
15 0 0
Share this story

मुंबई : ‘इंडियन प्रिमिअर लीग’ अर्थात ‘आयपीएल २०१८’ पर्वासाठी दिल्ली डेअरडेविल्स‍ (डीडी) संघाचा अधिकृत लॉजिस्टिक्स भागीदार म्हणून डीटीडीसीची नियुक्ती करण्यात आली आहे. 

एक्सप्रेस पार्सल सेवा देणारी ही आघाडीची  कंपनी  संघासाठी संपूर्ण लॉजिस्टिक्स कार्यसंचालनाची पाहणी करण्यासोबतच त्या‍ची सुविधादेखील देईल. यामुळे डीटीडीसीचा  लोगो डीडी संघातील खेळाडूंच्या गणवेषातील ट्राऊजरवर झळकताना दिसणार आहे. 

या सहयोगाबाबत बोलताना डीटीडीसीचे कार्यकारी संचालक अभिषेक चक्रबर्ती म्हणाले, ‘दिल्ली डेअरडेविल्स संघाचा आयपीएलमधील आजवरचा अपयशाचा काळ मागे टाकत आघाडीवर येण्याच्या मोहीमेचा भाग बनण्यास डीटीडीसी उत्सुक आहे.  व्यापक ग्राहकवर्ग निर्माण करण्याचा आणि राजधानी क्षेत्र वआसपासच्या प्रांतांमधील संघाच्या निष्ठावान चाहत्यांसोबत आमचे नाते अधिक प्रबळ करण्याचा मनसुबा आहे. आम्हाला आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या पर्वामधील सर्वात उत्साहवर्धक संघासोबत भागीदारी करताना खूप आनंद होत आहे. डीडीच्या या प्रयत्नांदरम्यान आमच्या ब्रँडला देखील मोठ्या प्रमाणात पसंती मिळेल, अशी आम्हाला खात्री वाटते.’
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link