Next
आयुर्वेदाच्या प्रसारासाठी जागतिक विद्यापीठांशी करार
प्रेस रिलीज
Wednesday, August 08, 2018 | 04:37 PM
15 0 0
Share this story

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि जागतिक विद्यापीठे यांच्यातील सामंजस्य करार कार्यक्रमादरम्यान, दीपप्रज्वलन करताना ऑस्ट्रेलियातील पर्यटनमंत्री पॉल पापलीया, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव व डॉ. दिलीप म्हैसेकर.

मुंबई : जागतिक स्तरावर आयुर्वेदाचा शास्त्रोक्त प्रचार व प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र (इंटरनॅशनल एज्युकेशन हब) उभारण्यात आले असून, जगभरातील वेगवेगळ्या विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. या करारांतर्गत संशोधन, विद्यार्थी देवाणघेवाण, प्रमाणपत्र अभ्यासक्रम आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.

मुंबईत नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री गिरीश महाजन, ऑस्ट्रेलियाचे पर्यटनमंत्री पॉल पापलीया, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांच्या उपस्थित या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. जवळपास ४० सामंजस्य करार करण्यात आले.

या वेळी पुण्यातील डॉ. हरिश पाटणकर यांनी नेदरलँडच्या प्रेमदानी आयुर्वेद क्लिनिकचे, डॉ. प्रियांका चोरगे यांनी जर्मनीतील आयुर्योगालयचे, डॉ. कुशाग्र बेंडाळे यांनी ऑस्ट्रेलियाचे, तर डॉ. आस्मा इनामदार यांनी अबुधाबीचे प्रतिनिधित्व केले.

 ‘आयुर्वेदाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी या सामंजस्य करारांचा उपयोग होईल’, असे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘जगभरात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या या उपक्रमामुळे सकारात्मक बदल होईल. सर्वांनी ज्ञानाची व कार्याची देवाणघेवाण करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे अनेक जणांना अनेक संधी उपलब्ध होतील.’

‘या उपक्रमामुळे संशोधनात्मक कार्य करण्यास व आयुर्वेदाला जगासमोर शास्त्रीय भाषेत मांडण्यास फार मोलाची मदत होईल’, असे केशायुर्वेदचे संचालक डॉ. हरिश पाटणकर यांनी सांगितले.

डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. कालिदास चव्हाण यांनी आभार मानले.
 सामंजस्य करार झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे पर्यटनमंत्री पॉल पापलीया यांच्यासमवेत डॉ. हरिश पाटणकर, डॉ. प्रियांका चोरगे डॉ. कुशाग्र बेंडाळे व डॉ. आस्मा इनामदार
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link