Next
‘आयएमए’तर्फे ‘डॉक्टर्स फॉर डॉक्टर्स’ उपक्रम
प्रेस रिलीज
Wednesday, June 12, 2019 | 05:51 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) वैद्यकीय विद्यार्थी, निवासी आणि चिकित्सकांमधील मानसिक तणावाचे आव्हान हाताळण्यासाठी ‘डॉक्टर्स फॉर डॉक्टर्स’ हा मार्गदर्शन करणारा उपक्रम सुरू केला आहे. 

या विषयी माहिती देताना ‘आयएमए’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सांतनू सेन म्हणाले, ‘या उपक्रमाद्वारे आम्ही कामाच्या तणावामुळे मानसिक उर्जा नष्ट होणे (बर्न आउट) मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हानांवर उपाय शोधणे, निवासी आणि चिकित्सकांमधील आत्महत्येचे प्रकार रोखणे आदी गोष्टींवर प्रतिबंध आणण्यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. समस्येसंदर्भात जागरूकता निर्माण करत आणि भावनिक स्वास्थ्यासाठी आवश्यक साधने वापरत आम्ही हे साध्य करणार आहोत. आम्ही स्व- मदतीचे प्रशिक्षण देणार असून गरजूंना या उपक्रमाची मोफत हेल्पलाइन पुरवणार आहोत.’

डॉक्टर्सनी सर्व डॉक्टर्सची काळजी घेतली पाहिजे, विशेषतः वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये नैराश्य आणि आत्महत्येचा धोका वाढत असल्याचे जागतिक चित्र दिसताना डॉक्टर्सनी स्वतःची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे झाले असल्याचे ‘आयएमए’तर्फे नमूद करण्यात आले. वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टर्समध्ये जागतिक पातळीवर हा धोका २.५ पटींनी वाढला असून, २४ ते ३७ वर्ष वयोगटातील व्यावसायिकांना जास्त धोका आहे. भारतातील चिकित्सकांमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी ४५ टक्के जणांची भावनिक दमणूक सर्वोच्च होती, तर ८७ टक्के डॉक्टर्स वैयक्तिक ध्येय साकारण्याच्या बाबतीत नीचांकी पातळीवर होते. उच्च तणाव आणि जोखमीखाली काम करणाऱ्यांना आत्महत्या व मानसिक उर्जा नष्ट होण्याचा धोका संभवत असून आपत्कालीन विभाग, प्रसूती विभाग, मानसोपचार, इंटेन्सिव्हिस्ट्स (आयसीयू डॉक्टर्स) आणि भूलतज्ज्ञ या विभागांतील तज्ज्ञांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो.

भारतातील वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टर्सचे मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्यासाठी काम करणाऱ्या ‘आयएमए’ राष्ट्रीय समितीच्या अध्यक्ष डॉ. नीलिमा कदाम्बी म्हणाल्या, ‘परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ‘आयएमए’ने ‘डॉक्टर्स फॉर डॉक्टर्स’ हा अभिनव उपक्रम सादर केला असून, त्यामागे वैद्यकीय विद्यार्थी, निवासी आणि चिकित्सकांमधील मानसिक आरोग्यासमोरील आव्हानांचे वाढते प्रमाण हाताळण्याचा हेतू आहे. याद्वारे शारीरिक दमणूक आणि मानसिक आरोग्य या बाबी धोरण व प्रशिक्षणांत बदल करून संपूर्ण यंत्रणेमध्ये हाताळल्या जाणार आहेत. या माध्यमातून वैद्यकीय विद्यार्थी, निवासी आणि चिकित्सकांमधे मानसिक स्वास्थ्य, स्थिर तसेच जुळवून घेण्याची वृत्ती रूजवली जाईल.’

‘आयएमए डीफॉरडी’ टीमने याआधीच बेंगळुरू, पुणे, दिल्ली, सूरत आणि कोचीन येथे वैद्यकीय व्यावसायिकांसाठी भावनिक स्वास्थ्य आणि दमणुकीबाबत जागरूकता आणि स्व-मदत कार्यशाळा घेतल्या आहेत. सध्या ‘आयएमए’ निवासी डॉक्टर्स आणि चिकित्सकांचे हिंसेविरोधात रक्षण करण्यासाठी, कनिष्ठ तसेच निवासी डॉक्टर्ससाठी चांगले जीवनमान आणि काम करण्याच्या सोयी, योग्य एचआर मार्गदर्शक तत्वे, कडक कागदपत्र प्रक्रिया, कॅम्पसवरील रॅगिंग, धमक्या, लैंगिक अत्याचार तसेच सामाजिक भेदभाव इत्यादींविरोधात संरक्षण पुरवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी व तो आणखी बळकट करण्यासाठी काम करत आहे. या उपक्रमाद्वारे वेळेवर साह्य तसेच सहज उपलब्ध होणारे व्यावसायिक कौन्सिलिंगही पुरवले जाणार आहे. ‘आयएमए’ने सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये आठवड्याचे २४ तास कौन्सिलिंग सेंटर्स सुरू करण्याची मागणी केली आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search