Next
‘मोतीलाल ओसवाल’तर्फे व्हॉटस्अॅपआधारे म्युच्युअल फंडात गुंतवणूक
प्रेस रिलीज
Friday, May 31, 2019 | 12:20 PM
15 0 0
Share this article:

मुंबई : मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनीतर्फे नवीन, तसेच नियमित गुंतवणूकदारांसाठी व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून म्युच्युअल फंड खरेदीची सुविधा सुरु करण्यात आली आहे. म्युच्युअल फंडांच्या व्यवहारांसाठी भारतात प्रथमच व्हॉटस्अॅप प्लॅटफॉर्मचा वापर करणारे ओसवाल मोतीलाल हे पहिले फंड हाउस ठरले आहे.

व्हॉटसअॅपने उद्योग क्षेत्रात क्रांती घडविली असून, अनेक कंपन्या आर्थिक व्यवहारांच्या नोंदी, तसेच पैशांची आवक-जावक करण्यासाठी हा प्लॅटफॉर्म वापरतात. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि काळानुरूप बदल स्वीकारण्यावर मोतीलाल ओसवालचा भर असून डिजिटल इंडियाच्या दिशेने हे पाऊल आहे. गुंतवणूकदार आता म्युच्युअल फंडाची खरेदी करण्यासाठी त्यांच्या मोबाइलमधील व्हॉटसअॅप वापरू शकतील. गुंतवणूकदारांनी नोंदणी केलेल्या मोबाइल क्रमांकावरून ‘मोतीलाल ओसवाल’मधील विविध फंडाचे व्यवहार अवघ्या दोन मिनिटांत पूर्ण होतील. व्यवहार पूर्ण होताच गुंतवणूकदारांना संदेश मिळतील. गुंतवणूकदार व्हॉ़टसअॅपच्या माध्यमातून त्यांच्या इच्छेप्रमाणे हवी ती रक्कम किंवा नियमित गुंतवणूक पद्धत अर्थात ‘एसआयपी’चे व्यवहारसुद्धा करू शकतील. 

ही नवीन सुविधा व्हॉटसअॅप पे या प्लॅटफॉर्मपासून पूर्णपणे वेगळी आहे; तसेच अन्य पेमेंट चॅनेलच्या वापरापेक्षाही भिन्न आहे. ‘मोतीलाल ओसवाल’ या प्लॅटफॉर्मसाठी ९३७२२ ०५८१२ हा क्रमांक वापरणार आहे. ग्राहकांची माहिती, पॅन कार्ड क्रमांकाच्या आधारे व्यवहार होणार आहे. ग्राहकाला त्याच्या व्हॉटस्अॅपवर पेमेंट लिंक पाठविली जाणार असून ती त्याच्या बँक खात्याशी संबंधित असून, त्याद्वारे त्याला निधी हस्तांतरित करता येईल.

नवीन उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ‘मोतीलाल ओसवाल एमएमसीचे’ व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आशिष सोमय्या म्हणाले, ‘आमच्या ग्राहकांना त्यांचे व्यवहार अतिशय सोपे आणि सहजरित्या करता येण्यासाठी आम्ही व्हॉटस्अॅपचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ग्राहकांना यापूर्वी वेबसाइट-मोबाइल अॅप तसेच देशभरातील मोतीलाल ओसवालची वितरण केंद्र या दोन प्रकारच्या माध्यमांबरोबर व्हॉटस्अॅपचा आणखी एक पर्याय मिळाला आहे. ग्राहकांना हव्या असलेल्या नवनवीन सेवांबरोबरच खात्यातील व्यवहारांच्या नोंदीची माहिती मिळण्यासाठी लवकरच नवीन सुविधा सुरू करणार आहेत.’
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search