Next
‘एसकेएफ इंडिया’ची उत्तम कामगिरी
प्रेस रिलीज
Saturday, July 28 | 01:55 PM
15 0 0
Share this story

पुणे : भारतातील आघाडीची बेअरिंग्ज, सील्स, ल्युब्रिकेशन सिस्टिम्स, मेकॅट्रोनिक्स आणि सर्व्हिसेस कंपनी असलेल्या एसकेएफ इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळाने ३० जून २०१८ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीच्या अलेखापरिक्षित आर्थिक निकालांना नुकतीच मान्यता दिली.

आर्थिक निकालांची ठळक वैशिष्ट्ये अशी : एसकेएफ इंडियाने वर्ष २०१८-१९ च्या पहिल्या तिमाहीत अत्यंत सक्षम कामगिरी करून दाखवली. ३० जून २०१८ रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीमध्ये एकूण ७५४९.५ दशलक्ष रुपयांची विक्री साध्य करण्यात आली. मागील वर्षी याच तिमाहीत ही विक्री ७२०८.८ दशलक्ष रुपये इतकी होती. या तिमाहीमध्ये मिळालेल्या इन्क्लुसिव ऑफ़ एक्साइज ड्यूटी समाविष्ट आहे. तुलनात्मक पातळीवर विचार करायचा झाल्यास ३० जून २०१८ रोजी संपलेल्या तिमाहीअखेरची विक्री ही मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत १३.३ टक्क्यांनी अधिक आहे.

या पहिल्या तिमाहीअखेर करपश्चात नफा ८०८.६ दशलक्ष रुपये झाला असून, मागील वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत (६४२.७ दशलक्ष) त्यामध्ये २५.८ टक्के वाढ निदर्शनास आलेली आहे.

या निमित्ताने बोलताना एसकेएफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल ऑरस्टाडीयस म्हणाले, ‘आमच्या ऑटोमोटीव्ह आणि इंडस्ट्रीयल अशा दोन्ही व्यवसायांत मिळालेल्या उत्तम मागणीच्या आधारे आम्ही या वर्षाची सुरुवात अतिशय सक्षमरित्या केलेली आहे. चांगल्या मान्सूनचे संकेत आणि २०१८-१९ मधील सुधारलेली अर्थव्यवस्था व त्याजोडीला ग्राहकांना त्यांची रोटेटिंग इक्विपमेंट परफॉर्मन्स सुधारण्यासाठी मदत करण्यावर आम्ही देत असलेला काटेकोर भर या सगळ्यामुळे आगामी काळातही अशीच स्थिर प्रगती साध्य होत राहील, याबाबत आम्ही आशावादी आहोत.’

(Please click here to read this news in English.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link