Next
दिवाळीच्या पहाटे रत्नागिरीत ‘स्वराभिषेक’
BOI
Wednesday, November 07, 2018 | 05:19 PM
15 0 0
Share this article:

दिवाळी पहाट मैफल सादर करणारे ‘स्वराभिषेक’चे कलाकार

रत्नागिरी : लक्ष्मीपूजनाच्या दिवसाचे औचित्य साधून रत्नागिरीतील स्वराभिषेक संस्थेच्या कलाकारांनी सात नोव्हेंबर २०१८ रोजी पहाटे शास्त्रीय आणि सुगम गीतांची मैफल रंगवली. त्यामुळे दिवाळीच्या पहाटे रत्नागिरीकर रसिकांवर जणू ‘स्वराभिषेक’च झाला. सुंदर संगीताच्या जोडीला रांगोळ्या आणि दिव्यांच्या रोषणाईने सजलेला रंगमंच, आकर्षक सजावट यामुळे वातावरण अधिकच मंगलमय झाले होते.

स्वराभिषेक संस्था आणि जयेश मंगल पार्क यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. ‘स्वराभिषेक’च्या विनया परब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शिष्यवर्गाने भैरव रागाने मैफलीला प्रारंभ केला. त्यानंतर मीरा सोवनी, साधना सोवनी, स्वरा भागवत, नेहल नेरूरकर, मीत भुवड, मीनल यादव, स्वरा लाकडे, अवधूत पंडित, धनश्री कामेरकर, अनुष्का घाणेकर, साक्षी जांभेकर, प्रियंका कामेरकर, स्वानंद तोडकर, यश सोहोनी, सई प्रभुदेसाई, आदित्य धाक्रस, श्याम तोडकर, मृणाल जोशी, ऋता पाटणकर, तन्वी मोरे, ईशा रहाटे, अंतरा निमकर, रिया मोरे, वेदांगी चक्रदेव, आदित्य पंडित, विदिशा कजबजे, मुक्ता जोशी, पद्मावती देशपांडे, मृणाल जोशी, राकेश बेर्डे, दादा सावंत, सिद्धी शिंदे, ऋता पाटणकर, ईशानी पाटणकर, रागिणी बाणे, मधुरा लाकडे या कलाकारांनी अभंग, भक्तिगीते, दिवाळीची विविध गीते, चित्रपटगीते बहारदारपणे सादर करून दिवाळी पहाट सुमधुर केली. 

श्रोत्यांनीही या कलाकारांना भरभरून दाद दिली. मैफलीकरिता महेश दामले (संवादिनी), केदार लिंगायत (तबला), मंगेश चव्हाण (पखवाज-ढोलकी), अद्वैत मोरे (तालवाद्य) आणि मंगेश मोरे (सिंथेसायझर) यांनी संगीतसाथ केली. ‘एस. कुमार साउंड’चे उदयराज सावंत, योगेश म्हस्के यांनी उत्तम ध्वनिसंयोजन केले. नवनीत कदम यांनी साजेशी प्रकाशयोजना केली. ऋता पाटणकर हिने माहितीपूर्ण निवेदनातून कलाकार आणि रसिकांमध्ये दुवा साधला. मैफलीच्या यशस्वितेसाठी ‘स्वराभिषेक’ची टीम, जयेश मंगल पार्कचे अॅड. राजशेखर मलुष्टे, ओंकार रहाटे आणि त्यांच्या टीमने मेहनत घेतली.

(कार्यक्रमाची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
मंगेश About 289 Days ago
सुंदर कार्यक्रम आणि तितकेच छान कव्हरेज
0
0

Select Language
Share Link
 
Search