Next
डोंबिवलीत लेखन कार्यशाळेचे आयोजन
प्रेस रिलीज
Monday, February 04, 2019 | 03:17 PM
15 0 0
Share this story

मुंबई : साहित्य, लेखन विषयांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदित आणि प्रस्थापित लेखकांसाठी दर्जेदार मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी साहित्य सेतू आणि डोंबिवली ग्रंथसंग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाच उपयुक्त विषयांवर प्रत्येकी एकदिवसीय लेखन कार्यशाळा डोंबिवली येथे फेब्रुवारी ते मार्च २०१९ दरम्यान आयोजित करण्यात आल्या आहेत.

नवोदित मराठी लेखकांमध्ये मार्गदर्शनाचा अभाव असल्याचे अनेकवेळा दिसून आले आहे. म्हणूनच साहित्य सेतूचे संस्थापक प्रा. क्षितीज पाटुकले यांनी लेखन कार्यशाळा ही अभिनव संकल्पना मांडली. गेली तीन वर्षे पुणे येथे या लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यांना प्रचंड प्रतिसाद लाभला. डोंबिवली, कल्याण व मुंबई परिसरातील अनेक उत्साही व्यक्तींनी दाखवलेल्या प्रतिसादामुळे या कार्यशाळा डोंबिवली येथे आयोजित केल्या आहेत. या सर्व कार्यशाळा सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होतील.

यातील पहिली कार्यशाळा ‘ब्लॉगलेखन कसे करावे’ या विषयावर १० फेब्रुवारी रोजी होणार असून, यात आदित्य दवणे, व्यंकटेश कल्याणकर, विष्णू वजार्डे आदी मार्गदर्शन   करणार आहेत. दुसरी कार्यशाळा १७ फेब्रुवारीला होणार असून, यात विवेक वेलणकर, भालचंद्र कुलकर्णी, प्रा. क्षितिज पाटुकले हे ‘व्यावसायिक लेखक बना’ (कॉपीराइट, आयएसबीएन, रॉयल्टी, ई-बुक, अॅमेझॉन किंडल आवृत्ती, अमेझॉन, फ्लिपकार्टद्वारे ऑनलाइन पुस्तक विक्री) यावर मार्गदर्शन करतील. ‘कथालेखन कसे करावे’ या विषयावर तीन मार्चला तिसरी कार्यशाळा होणार असून, यात भारत सासणे, मोनिका गजेंद्रगडकर, नीलिमा बोरवणकर, माधवी घारपुरे मार्गदर्शन करतील.

चौथी कार्यशाळा ‘अनुवाद कसा करावा’ १० मार्चला आयोजित केली असून, यात चंद्रकांत भोंजाळ, नरेंद्र गोळे, जयश्री देसाई मार्गदर्शन करणार आहेत. ‘लेखक- तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया, किंडल बुक, ई-बुक, ऑडिओ बुक’ यावर पाचवी कार्यशाळा आयोजित केली असून, ती १७ मार्चला होईल यात प्रा. क्षितीज पाटुकले, व्यंकटेश कल्याणकर, ओंकार दाभाडकर हे मार्गदर्शन करतील. २४ मार्चला ‘आर्थिक स्तंभलेखन आणि आर्थिक साक्षरता’ ही कार्यशाळा होणारा असून, यात चंद्रशेखर टिळक, प्रा क्षितिज पाटुकले मार्गदर्शन करतील. ही कार्यशाळा सर्वांसाठी मोफत आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे

कार्यशाळेविषयी :
दिवस : १०, १७ फेब्रुवारी, तीन, १० व १७ मार्च २०१९  
वेळ : सकाळी १० ते सायंकाळी ५.३० या
स्थळ : टिळकनगर विद्यामंदिर, युको बँक जवळ, फ्रेंड्स लायब्ररी समोर, डोंबिवली (पूर्व) ४२१ २०१.
ऑनलाईन नोंदणीसाठी : www.sahityasetu.org/karyshala
प्रत्यक्ष नोंदणीसाठी : डोंबिवली ग्रंथसंग्रहालय, डोंबिवली पश्चिम रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म एक समोर, घनश्याम गुप्ते पथ, डोंबिवली (पश्चिम).
वेळ : सकाळी नऊ ते १२ आणि सायंकाळी पाच ते रात्री आठ (रविवारी संध्याकाळी सुट्टी)
संपर्क क्रमांक : (०२५१) २४८३५७२
अधिक माहितीसाठी संपर्क : प्रा. अनिकेत पाटील- ७०६६२ ५१२६२
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link