Next
पाबळच्या कन्येची सातासमुद्रापार झेप
अमेरिकेत दुग्धव्यवसाय अभ्यासासाठी निशा जाधवची निवड
BOI
Tuesday, August 07, 2018 | 04:36 PM
15 0 0
Share this story

निशा जाधव
पुणे : पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पाबळ गावच्या निशा जाधव हिची अमेरिकेतील मिनेसोटा विद्यापीठात निवड झाली आहे. ‘कॉलेज ऑफ फूड अ‍ॅग्रीकल्चर अँड नॅचरल सायन्सेस’ येथे दुग्धव्यवसायाचे विशेष शिक्षण घेण्यासाठी नुकतीच ती अमेरिकेला रवाना झाली. एका वेगळ्या क्षेत्राची निवड करून त्यात लक्षणीय यश मिळवलेल्या निशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
अमेरिकेतील नामांकित विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच निशाने अभ्यासक्रम संपवून अमेरिकेहून परत आल्यानंतर पाबळ गावात स्वत:चा डेअरी व्यवसाय सुरू करण्याचा मानस व्यक्त केला आहे. येथे अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने डेअरी फार्मिंग व प्रोसेसिंगची कामे केली जातील. यातून पुणे जिल्ह्यातील अनेकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा असल्याचे तिने सांगितले. ‘शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून डेअरी उद्योग हा योग्य पर्याय असून, तो त्यांचे अनेक प्रश्न सोडवायला व जीवनमान उंचवायला मदतीचा ठरेल. देशातील दुग्धव्यवसाय सध्या कात टाकत असून, महाराष्ट्रातही मला अधिक व्यापक प्रमाणात भरीव काम करण्याची संधी या निमित्ताने मिळेल,’ असेही तिने सांगितले. 

मिनेसोटा विद्यापीठ
पाबळमधील एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात वाढलेली निशा ही पुण्यातील प्रोलर्न इंडिया संस्थेच्या अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी आहे. ‘प्रोलर्न इंडिया’तर्फे अमेरिकेतील शिक्षणासाठी तिची निवड झाली आहे. यामध्ये एक वर्षाची इंटर्नशिप आणि चार महिन्यांच्या डिप्लोमाचा समावेश आहे. 

‘निशा डेअरी व्यवस्थापन आणि उत्पादन या क्षेत्राचा पद्धतशीर अभ्यास करण्यासाठी अमेरिकेला जात आहे. महाराष्ट्रातील समस्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबातील मुलींपुढे तिने ‘हम किसी से कम नहीं’ हा आदर्श घालून दिला आहे. आमच्यासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे,’ अशी भावना प्रोलर्न इंडिया संस्थेचे संचालक नितीन ठाकूर यांनी व्यक्त केली.

बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही निशाचे अभिनंदन केले असून, ‘महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अभिमान वाटावी असे कर्तृत्व तिने दाखवले आहे,’ असे गौरवोद्गार त्यांनी काढले. निशाच्या निमित्ताने डेअरी क्षेत्रात पहिली महिला उद्योजक निर्माण होत असल्याबद्दल त्यांनी आनंदही व्यक्त केला. 

भारत हा दुग्ध उत्पादनात जगातील आघाडीचा देश असून, पूरक उद्योग म्हणून मोठ्या प्रमाणात शेतकरी हा व्यवसाय करतात. दुधावर प्रक्रिया करून दूध पावडर, चीज, तूप, पनीर असे विविध पदार्थ बनवण्याचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात केला जातो. या पदार्थांची निर्यातही होते. त्यामुळे या क्षेत्रात मोठी संधी आहे. महिलांसाठीही हे क्षेत्र नवीन संधी निर्माण करणारे असून, त्या वाटेवर चालण्याचा आदर्श निशा जाधवने घालून दिला आहे. 

निशा जाधवसह प्रोलर्न इंडिया संस्थेचे संचालक नितीन ठाकूर, संस्थेच्या संचालक पल्लवी गोडसे व संस्थेचे सल्लागार राजेश खाले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link